विना शिफारशींच्या कीटकनाशकांवर बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:15 PM2017-10-10T23:15:42+5:302017-10-10T23:15:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे केली
यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात २ महिन्यांत ३५ शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला. जिल्ह्यात दोन शेतकºयांचा बळी गेला, तर आठ महिन्यांत १५४ शेतकºयांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. विनाशिफारशींच्या कीटकनाशकांची कृषीसेवा केंद्रात विक्री झाल्यानेच शेतकºयांवर हे संकट ओढावले आहे. ही संख्या वाढतच असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन दुकानांमध्ये विक्रीसाठी असलेली कीटकनाशके हद्दपार करावीत तसेच बंदी असलेल्या कीटकनाशकांचा जिल्ह्यात शिरकाव होवू नये यासाठी दक्षता घ्यावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई यांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आ.ठाकूर यांनी कर्मचाºयांशी संवाद साधला.
महसूल कर्मचाºयांशी साधला संवाद
जिल्हा महसूल कर्मचारी लिपिकवर्गीय संघटना अमरावतीच्या आंदोलनात सहभागी कर्मचारी, अव्वल कारकून यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आश्वासन आ.यशोमती ठाकूर यांनी दिले. येत्या १३ आॅक्टोबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणाºया अमरावती येथील बैठकीतसुद्धा यावर मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.