बंजारा समाजाचा तीज महोत्सव प्रारंभ
By admin | Published: August 31, 2015 12:06 AM2015-08-31T00:06:07+5:302015-08-31T00:06:07+5:30
शहरातील सर्व बंजारा बांधव व भगिनींच्या उपस्थितीत तांड्याचे नायक एम.एच राठोड यांच्या निवासस्थानी शनिवारी तीज रोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अमरावती : शहरातील सर्व बंजारा बांधव व भगिनींच्या उपस्थितीत तांड्याचे नायक एम.एच राठोड यांच्या निवासस्थानी शनिवारी तीज रोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बंजारा तांड्याचे नायक एम.एच. राठोड, प्रल्हाद चव्हाण, कारभारी उदय राठोड, अमरसिंग राठोड, राम पवार, जंयत वडते, अजाबराव राठोड, चंदन राठोड, भावराव चव्हाण, एस.आर.जाधव, अॅड. राम आडे, पंडित राठोड, सुभाष चव्हाण, मोहन चव्हाण, हिरालाल जाधवविशाल जाधव, बालकदास जाधव, विजू आडे, एल.पी. राठोड, बबन राठोड,सुमेरसिंग राठोड, जी.एच. राठोड, के.डी. चव्हाण, उदय पवार आदींची उपस्थिती होती.
श्रावण महिन्यात दरवर्षी ग्रामीण भागासह शहरातही बंजारा समाजाच्यावतीने उत्साहात तीज महोत्सव साजरा केला जातो. यात मुली, महिला व पुरुषांचाही सहभाग असतो. प्राचीनकाळी हा समाज व्यवसायानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करीत होता. पावसाळ्याच्या दिवसांत शेती व्यवसायाकरिता पुन्हा एकत्र येत असे. त्यावेळी विविध कार्यक्रम साजरा करून वेगळी संस्कृती निर्माण केली. त्याचप्रमाणे संस्कृतीचा एक भाग असलेला हा तीज उत्सव होय. हा महोत्सव ९ दिवस चालतो. दररोज तिजेला पाणी घालण्याचे नियोजन केले जातात. त्यानिमित्ताने बंजारा गीतांवर नृत्य सादर केले जातात. यामागील उद्देश असा की, कुमारी मुलींना भावी जीवनात चांगला वर मिळो, तिला सुख-समृद्धी व भरभराटी मिळो, यासाठी निसर्गराज्याला प्रार्थना केली जाते.
शनिवारपासून तीज उत्सवाला सुरुवात झाली असून ५ सप्टेंबर रोजी ढंबोळीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राधा-कृष्णाची पूजाअर्चा केली जाईल. तसेच ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ६ वाजतादरम्यान तीज विसर्जनाचा कार्यक्रम स्थानिक संस्कार लॉन विद्यापीठ मार्ग येथे होईल. याप्रसंगी समाजातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाईल.