बँकेचा अधिकारी सांगून ओटीपी घेऊन इसमाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:36+5:302021-04-29T04:09:36+5:30
दर्यापूर : भारतीय स्टेट बँकचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ओटीपी घेऊन एका इसमाची १६,७०० रुपयांची फसवणूक ...
दर्यापूर : भारतीय स्टेट बँकचा अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ओटीपी घेऊन एका इसमाची १६,७०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना दर्यापुरातील वसंतनगरात घडली. राजेंद्र आकोशराव बागळे (५९) यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. संबंधित व्यक्तीने एसबीआय बँकेचे अधिकारी बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे. केवायसी केला नाही, असे सांगून काही माहिती मागितली. राजेंद्र यांनी माहिती दिली नाही. परंतु त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक दिला. त्याचवेळी त्यांच्या खात्यातून ६,७०० रुपये ऑनलाईन पैसे काढून घेण्यात आले. तसेच काही दिवसानंतर आणखी दोन विविध क्रमांकावरून कॉल आला. परंतु राजेंद्र बोलले नाही. परंतु त्यांच्या खात्यातून आणखी दहा हजार रुपये काढून घेण्यात आले. या फसवणुकीची तक्रार राजेंद्र बागळे यांनी दर्यापूर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल धारक अमित कुमार नावाच्या व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविला.