भाजप पाचपट परतावा देणारी बँक

By Admin | Published: February 18, 2017 12:08 AM2017-02-18T00:08:17+5:302017-02-18T00:08:17+5:30

मतदान ही एक गुंतवणूक आहे. चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेपोटी ती गुंतवणूक केली जाते.

Bank redemption bank five times | भाजप पाचपट परतावा देणारी बँक

भाजप पाचपट परतावा देणारी बँक

googlenewsNext

मुख्यमंत्री : स्मार्ट नियोजन करण्याचे आवाहन
अमरावती : मतदान ही एक गुंतवणूक आहे. चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेपोटी ती गुंतवणूक केली जाते. तूर्तास काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षाच्या बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. तथापि पाचपट परतावा देणारी भाजप ही एकमेव प्रगतीपथावरील बँक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
स्थानिक दसरा मैदानातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख ,जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
वाढत्या शहरीकरणाने उदभवलेल्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकांनी घनकचरा व्यवस्थापनासह पेयजलाचे सुयोग्य नियोजन करावे,अशी सूचना त्यांनी केली. राज्यात सुमारे ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यातही ७५ टक्के लोक २६ शहरांत राहतात. अमृतसह स्वच्छ भारत अभियानामुळे शहरांचा चेहरामोहरा पालटू लागला आहे. विकासाच्या या प्रवाहात सहभागी होण्यासाठी अमरावती महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकांपर्यंत पेयजल पोहोचविण्यासाठी स्मार्ट आणि आधूनिक योजना तयार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अमृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणखी निधी देऊ, असेही ते म्हणाले. यावेळी महापालिका निवडणूक लढविणारे भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते. राज्य शासनाने अलीकडे नागरी स्थानिक संस्थांना भरभरुन निधी देऊन विकास कामांचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Bank redemption bank five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.