कर्जमाफीमुळे बँकाच मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:01 AM2018-01-10T00:01:21+5:302018-01-10T00:01:44+5:30

Banks will be eligible for loan waiver | कर्जमाफीमुळे बँकाच मालामाल

कर्जमाफीमुळे बँकाच मालामाल

Next
ठळक मुद्देएनपीएमध्ये घट : १००७ कोटींची थकबाकी, जिल्हा बँकेच्या स्थितीत सुधार

गजानन मोहोड ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांच्या दीड लाखांच्या कर्जमाफीसह प्रोत्साहनपर योजना व एकरकमी भरणा (ओटीएस) मुळे बँकांचा एनपीए (अनुत्पादित मालमत्ता) कमी होणार आहे. बँकांची सद्यस्थितीत १००७ कोटी ६७ लाखांची थकबाकी आहे, तर ४३७ कोटींची कर्जमाफी बँकाकडे वर्ग करण्यात आली. यात सर्वाधिक फायदा बँकाचा होत आहे. जिल्हा बँकेचा एनपीए हा २० टक्क्यांपर्यंत आहे. तो आणखी कमी होणार असल्याने बँकेची आर्थिक स्थिती सुधारेल.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत १ एप्रिल २००८ पासून ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार शेतकरी खातेदारांनी पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केलेत. यामध्ये जिल्हा बँकेच्या १ लाख ४ हजार शेतकºयांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी होऊन तात्पुरत्या पात्र लाभार्थींची यादी आयटी विभागाला पाठविण्यात आली. आतापर्यंत ५० हजार ९८४ शेतकऱ्यांना २१३ कोटी १ लाख रुपयांची रक्कम जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकांच्या ३४ हजार १५८ खातेदारांना २२४ कोटी ३० लाख ५२ हजारांचा लाभ देण्यात आला. अद्याप ही प्रक्रिया सुरूच आहे. त्याचप्रमाणे एकरकमी कर्जाचा भरणा करून २५ हजारांपर्यत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेणारे किमान १३ हजार खातेदारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
बँकांचा पाच टक्क्यांपर्यंतचा एनपीए असला, तर बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे गृहीत धरण्यात येते. यंदा किमान एक हजार कोटीपर्यंत कर्जमाफीसह अनुदानाचा लाभ शेतकरी खातेदारांना मिळणार आहे. यामध्ये नियमित कर्जदार वगळता इतर थकबाकीदार खातेदारांचे कर्जदेखील माफ होत आहे, तर एकरकमी परतफेडीमध्ये बँँकांची थकबाकी बºयाच प्रमाणात निकाली निघाली. यामुळे बँकांचा वाढलेला एनपीएदेखील झपाट्याने सुधारत आहे. प्रामुख्याने जिल्हा बँकांच्या अर्थिक स्थितीत सुधार येत आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी बँका मालामाल होत आहेत, हे निश्चित.
जिल्ह्यातील बँकांची थकबाकी
व्यापारी बँकांची ४५,३६४ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ८७.०४ कोटी, १ लाखांपर्यंत ३९,६२९ खातेदारांकडे १८९.४८ कोटी, दीड लाखांपर्यंत १५,८७१ खातेदारांकडे ११३.१८ कोटी, दोन लाखांपर्यंत ८७४ खातेदारांकडे ६३.३२ कोटी, २ लाखांवर ९८२३ खातेदारांकडे २५१.८ कोटी अशी एकूण १,१३,६११ खातेदारोंकडे ७१८.२४ कोटींची थकबाकी आहे.

ग्रामीण बँकांची २०२ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ६३.१६ कोटी, १ लाखांपर्यंत ३४३ खातेदारांकडे २.५२ कोटी, दीड लाखांपर्यंत १७१ खातेदारांकडे १.९६ कोटी, दोन लाखांपर्यत ८७४ खातेदारांकडे २६.०५ कोटी, २ लाखांवर ९८२३ खातेदारांकडे २६.०५ लाख अशी एकूण १६३४ खातेदारांकडे ७.१५ कोटींची थकबाकी आहे.

जिल्हा बँकेची २३,८५७ खातेदारांकडे ५० हजारांपर्यंत ९९.३२ कोटी, १ लाखांपर्यंत २५,१३२ खातेदारांकडे ११९.७४ कोटी, दीड लाखांपर्यंत ९,६०८ खातेदारांकडे ५६.९४ कोटी, दोन लाखांपर्यंत १,८४८ खातेदारांकडे १.०९ कोटी, २ लाखांवर ८६२ खातेदारांकडे ५.११ कोटी अशी एकूण ६१,३०७ खातेदारांकडे २८२.२१ कोटींची थकबाकी आहे

जिल्हा बँकेचा ग्रॉस एनपीए ११२ कोटींवर
जिल्हा बँकेच्या ३१ मार्चच्या ताळेबंदानुसार, यंदाचा ग्रॉस एनपीए ११२.३३ कोटींवर आहे. हा साधारणपणे २० टक्के या प्रमाणात आहे. पूर्वीच्या तुलनेत बँकेच्या एनपीएत सुधार होत असला तरी ही स्थिती इतर बँकांच्या तुलनेत निश्चितच चांगली नसल्याचे मानण्यात येते. यात कर्जमाफीने सुधार होणार आहे. २०१५ मध्ये जिल्हा बँकेचा ग्रॉस एनपीए २६० कोटींवर होता. ही टक्केवारी २९.४५ होती. तो २०१४ मध्ये २५४ कोटी २० लाखांवर होता. ही टक्केवारी २५.३८ होती.
बँकांची १००७.६१ कोटींची थकबाकी
जिल्ह्यातील बँकाची १ लाख ७६ हजार ५५२ शेतकऱ्यांकडे १००७ कोटी ६१ लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये १ लाख ३१ हजार ३४१ खातेदारांकडे ६६० कोटी ४५ लाखांचे पीक कर्ज थकीत आहे, तर ५० हजार १६५ खातेदारांकडे ३७४ कोटी ७७ लाखांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. सद्यस्थितीत ८५ हजार १४२ खातेदारांचे ४३७ कोटी ३१ लाख ५१ हजारांचे कर्ज बँकांना वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Banks will be eligible for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.