इतवारा बाजारात बॅरिकेड्स, पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:46+5:302021-05-25T04:13:46+5:30
अमरावती : इतवारा बाजारात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील सर्व रहदारीचे रस्ते रविवारी सकाळी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात ...
अमरावती : इतवारा बाजारात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी या परिसरातील सर्व रहदारीचे रस्ते रविवारी सकाळी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. त्यामुळे रविवारी इतवारा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठलीही हातगाडी दिसून आली नाही, त्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. चित्रा चौक ते टांगापडाव दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागत असल्यामुळे गर्दी वाढली होती. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही बाब पाहता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी २३ मे रोजी इतवारा बाजार परिसराचा आढावा घेऊन पोलिसांनी सूचना दिल्या. त्यानुसार रविवारी चित्रा चौक ते टांगापडावदरम्यानच्या संपूर्ण गल्लीबोळात बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्या. तसेच इतवारा बाजार परिसरात व चित्रा चौकातून टांगापडावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
बॉक्स
रहिवासी क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू खरेदी करा
नागरिकांनी फळ व भाजीपाला खरेदीसाठी इतवारा बाजारात येऊ नये व गर्दी करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आपापल्या रहिवासी परिसरातूनच जीवनावश्यक वस्तू व फळ, भाजीपाल्याची खरेदी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.