मतमोजणी केंद्र मार्गावर बॅरिकेडिंग, पोलीसही सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:51 AM2019-05-23T00:51:22+5:302019-05-23T00:51:41+5:30
मतमोजणीवेळी स्ट्राँग रूमसमोरील बडनेरा मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक पोलीस सज्ज राहणार आहेत. पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात दोन पोलीस उपनिरीक्षक व १० कर्मचारी स्ट्राँग रूमजवळील वाहतुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
अमरावती : मतमोजणीवेळी स्ट्राँग रूमसमोरील बडनेरा मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी ट्राफिक पोलीस सज्ज राहणार आहेत. पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात दोन पोलीस उपनिरीक्षक व १० कर्मचारी स्ट्राँग रूमजवळील वाहतुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
अमरावती-बडनेरा महामार्गावर नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. त्यातच नेमाणी गोदाम येथील स्ट्राँगरूममध्ये मतमोजणी असल्यामुळे या मार्गावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची प्रचंड वर्दळ राहणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यावर वाहतूक पोलीस लक्ष ठेवणार आहे.
नेमाणी गोदामसमोरील मार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलीस सांभाळणार असून, गोपालनगर, नवाथेनगर, बडनेरा जुनी वस्तीतील चौकातही वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. नेमाणी गोदामाच्या आजूबाजूला असणाऱ्या दोन मोकळ्या मैदानांचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जाणार आहे.
नागरिकांची होणार तपासणी
नेमाणी गोदामसमोरील बडनेरा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू राहणार आहे. स्टाँग रूमपासून शंभर मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून मेटल डिटेक्टरद्वारे त्या परिसरात जाणाºया नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नेमाणी गोदामच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात त्यांची वाहने उभी केली जाणार आहेत. याशिवाय सरकारी कामानिमित्त येणाºया अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.