गावठी दारुची भट्टी नेस्तनाबूत

By admin | Published: April 11, 2016 12:07 AM2016-04-11T00:07:12+5:302016-04-11T00:07:12+5:30

सातपुड्याच्या कुशीतील पुसली गावालगत जीवना नदीच्या पात्रात गावठी मोहाची दारू निर्मिती करणारा कारखाना

Bastille barbecue furnace | गावठी दारुची भट्टी नेस्तनाबूत

गावठी दारुची भट्टी नेस्तनाबूत

Next

शेंदूरजनाघाट पोलिसांची कारवाई : लाखो रुपयांची गावठी दारू पकडली
वरूड : सातपुड्याच्या कुशीतील पुसली गावालगत जीवना नदीच्या पात्रात गावठी मोहाची दारू निर्मिती करणारा कारखाना शेंदूरजनाघाट पालिसांनी धाडसत्र राबवून पकडला. यामध्ये १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल मोहा सडवा तसेच गावठी दारुचे ट्यूब जप्त केले. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसली गावालगतच्या सातपुड्याच्या जंगलातील जीवना नदीपात्रात गावठी दारू निर्मितीचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून ठाणेदार अशोक लांडे, लक्ष्मण साने, नीलेश डफळे, सचिन मसांगे, अमोल नवले, नीलेश नेवारे , रत्नदीप वानखडे ेयांनी शिताफीने धाडसत्र राबवून खुलेआम गावठी दारु निर्मीती करतांना रंगेहात पकडले. यामध्ये हजारो लिटर मोहा सडवा, गावठी दारू, साहित्य, ट्यूब, ड्रम आदी साहित्यासह एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये भट्टीचालक हरिश्चंद्र जग्गू मसराम २४ रा. पांढरी मध्य प्रदेश याला अटक करून मुंंबई दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bastille barbecue furnace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.