झेडपीच्या आवारात उपाहारगृहाचा अडसर

By admin | Published: May 12, 2016 12:26 AM2016-05-12T00:26:10+5:302016-05-12T00:26:10+5:30

येथील जि.प. परिसरात असलेले उपाहारगृहाचे सांडपाणी आणि स्वयंपाकगृहामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Batting of dinner hall in Zwo's premises | झेडपीच्या आवारात उपाहारगृहाचा अडसर

झेडपीच्या आवारात उपाहारगृहाचा अडसर

Next

वाहनतळाच्या जागेवरच टेबलचा पसारा : सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात, सिलिंडरमुळे धोका
मनीष कहाते अमरावती
येथील जि.प. परिसरात असलेले उपाहारगृहाचे सांडपाणी आणि स्वयंपाकगृहामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कार्यालयाशेजारी घाणीचे साम्राज्य आहे. तिथेच गॅसचे दोन-तीन सिलिंडर असल्याने केव्हाही स्फोट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनतळाच्या जागेवर उपाहारगृहाने अतिक्रमण केल्याने वाहनांच्या अस्ताव्यस्त रांगा दिसत आहेत.
जि.प. सहकारी पतसंस्थेंतर्गत येथील उपाहारगृह सुरू आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी उपाहारगृहाच्या जागेवर वाहनतळ होते. वाहनतळामध्येच उपाहारगृह सुरू झाले. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी राहतात. याच परिसरात बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि बांधकाम खात्याचे उपविभाग आहेत. परिसरात असलेले भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाला लागूनच उपाहारगृह आहे. शेजारीच स्वयंपाकगृह आहे. त्या ठिकाणी ग्राहकांकरिता टेबल-खुर्च्या ठेवल्या आहेत. तिथेच गॅसचे सिलिंडर आहे आणि तिथेच भांडी धुण्याकरिता जागा आहे. भांडी धुतल्यानंतर खरकटे पाणी आणि खरकटे कार्यालयाच्या शेजारीच फेकले जाते. त्यामुळे कार्यालयातील वातावरण दूषित होते. खरकट्याची दुर्गंधी कार्यालयात येते. त्यामुळे कोणीच कार्यालयात बसत नाही. अधिकाऱ्यांनी उपाहारगृह चालकाला विनंती करून सांगितले. पण कोणताही फरक पडला नाही. २०० अधिकारी, कर्मचारी परिसरात ये-जा करतात. कोर्टाचे वकील आणि पक्षकारांचीही सारखी वर्दळ राहते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: Batting of dinner hall in Zwo's premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.