बाविस्कर नवे सीपी झळके एसपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:54 PM2018-07-28T22:54:23+5:302018-07-28T22:54:58+5:30

शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातील उपमहानिरीक्षकपदी झाली. शहरात नवे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आता लवकरच शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणार आहेत.

Baviskar signs new SP SP | बाविस्कर नवे सीपी झळके एसपी

बाविस्कर नवे सीपी झळके एसपी

googlenewsNext
ठळक मुद्देमंडलिक पुण्यात : अभिनाषकुमार मुंबईत
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातील उपमहानिरीक्षकपदी झाली. शहरात नवे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आता लवकरच शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणार आहेत. यासोबतच अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची बदली मुंबई शहरात पोलीस उपायुक्तपदी झाली.
पोलीस उपायुक्तपदी निवा जैन
त्यांच्या पदावर परभणी येथील पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली करण्यात आली आहे. गृहविभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी राज्यातील १२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी उशिरा रात्री धडकले. आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई गृह विभागाने शनिवारी हे बदल्याचे आदेश काढले. सीपी दत्तात्रय मडंलिक यांनी अमरावतीत कायदा व सुव्यवस्थेसाठी अथक परिश्रम घेतले होते.
पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकाºयाचे कर्तव्य बजावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवले होते. आयपीएस अधिकाºयांच्या बदली सत्रात पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांचीही बदली करण्यात आली असून, त्यांचे नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी स्थानांतरण करण्यात आले आहे. त्याच्या पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाºया निवा जैन शहर आयुक्तालयात येणार आहे. त्याचप्रमाणे अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मिना यांची बदली अहमदनगर येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.
नवे अधिकारी सोमवारी होणार रुजू
माहितीनुसार, अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात पद्दोन्नती बदली होऊन येणारे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Baviskar signs new SP SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.