बीडीओ राहिले ‘हवेतच’

By admin | Published: April 15, 2017 12:10 AM2017-04-15T00:10:07+5:302017-04-15T00:10:07+5:30

अचलपूर पंचायत समितीला पंचायत राज योजनेत मिळालेला पुरस्कार विचित्र कारणाने चर्चेत आला आहे.

BDO remains 'must be' | बीडीओ राहिले ‘हवेतच’

बीडीओ राहिले ‘हवेतच’

Next

पुरस्कार सोहळा : विमान प्रवास पडला महाग, सभापतींची रेल्वे पोहोचली अगोदर
परतवाडा : अचलपूर पंचायत समितीला पंचायत राज योजनेत मिळालेला पुरस्कार विचित्र कारणाने चर्चेत आला आहे.पुरस्कार वितरण सोहळ्यास वेळेत पोहोचता यावे म्हणून विमानाने गेलेल्या खंडविकास अधिकाऱ्यांना या सोहळ्यात वेळेवर उपस्थित राहता आले नाही. मात्र, रेल्वेने या सोहळ्यासाठी गेलेले अचलपूर पंचायत समिती सभापती व इतर पदाधिकारी मात्र वेळेत कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी पुरस्कारही स्वीकारला.
अचलपूर पंचायत समितीला पंचायत राज अभियानांतर्गंत पुरस्कार घोषित झाला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण गुरूवारी होणार होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहणे, ही अभिमानाची बाब असताना प्रवासाच्या दोन साधनांमुळे झालेला प्रकार चर्चेत राहिला. खंडविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले आणि तृतीय श्रेणी कर्मचारी विकल मेहरा विमानाने रवाना झाले. मात्र, पुरस्कार सोहळ्याला ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, विदर्भ एक्सप्रेसने निघालेले पंस.सभापती देवेंद्र पेठकर, उपसभापती सोनाली तट्टे, पं.स. सदस्य कविता बोरकर, सहायक बीडीओ एम. डब्ल्यू.कनाटे, कर्मचारी आशिष निमकर, टाले, जुनेद, भय्या काकडे हे मुंबईला पहाटे सहा वाजता पोहोचले. आणि त्यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. तर पंचायत समिती सभापती देवेंद्र पेठकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मात्र, खंडविकास अधिकारी हवेतच राहिले.

सभापतींनी स्वीकारला पुरस्कार
अचलपूर पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विमान प्रवासाने निघालेले खंडविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले व विकल मेहरा वेळेवर पोहोचू शकले नाहीत. धावपळ करीत ११.१५ वाजता त्यांनी कशीबशी हजेरी लावली.

मुंबई येथील पुरस्कार सोहळ्यासाठी रेल्वेने गेलो होतो. तेथे राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार स्वीकारला. बीडीओ विमानाने गुरुवारी निघाले मात्र ते उशिरा हजर झाले.
- देवेंद्र पेठकर, सभापती, पं.स.अचलपूर.

Web Title: BDO remains 'must be'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.