शहरातील हुक्का पेन विक्रेता झाले सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:16 PM2019-03-02T23:16:41+5:302019-03-02T23:16:59+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवाहर गेट परिसरातील एका व्यापारी प्रतिष्ठानातून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर शहरातील अन्य हुक्का पेन विक्रेता सावध झाले. मुद्देमाल लपवून ठेवल्याचे पोलिसांनी शहरातील चार ते पाच ठिकाणी झडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी समज दिला.
अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवाहर गेट परिसरातील एका व्यापारी प्रतिष्ठानातून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर शहरातील अन्य हुक्का पेन विक्रेता सावध झाले. मुद्देमाल लपवून ठेवल्याचे पोलिसांनी शहरातील चार ते पाच ठिकाणी झडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी समज दिला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हुक्का पेनमध्ये टाकला जाणारा तरल पदार्थ न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला असून, तो पदार्थ नशेसाठी किंवा घातक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास, संबधीत हुक्का पेन विक्रेत्याविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद केला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी दुकान संचालक आशिष झांबाणीविरुध्द भादंविच्या कलम २७३ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात पोलिसांची चौकशी सुरु असून, पोलिसांनी चौकशीसाठी न्यायालयातून परवानगी मिळविली आहे.
पोलिसांच्या जवाहर गेट परिसरात धाड टाकून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील अन्य काही ठिकाणीही धाडी घातल्या. अन्य विक्रेत्यांनी हुक्का पेन लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यांना समज दिला आहे.
- शशिकांत सातव
पोलीस उपायुक्त