सावधान! तहसील कार्यालयात सीसीटीव्ही

By Admin | Published: November 22, 2014 12:00 AM2014-11-22T00:00:58+5:302014-11-22T00:00:58+5:30

तहसिल कार्यालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप त्यासोबतच भ्रष्टाचाराची वाढती टक्केवारी रोखण्यासाठी या कार्यालयात बसविण्यात आलेल्या...

Be careful! CCTV at Tehsil office | सावधान! तहसील कार्यालयात सीसीटीव्ही

सावधान! तहसील कार्यालयात सीसीटीव्ही

googlenewsNext

मोहन राऊत अमरावती
तहसिल कार्यालयातील दलालांचा वाढता हस्तक्षेप त्यासोबतच भ्रष्टाचाराची वाढती टक्केवारी रोखण्यासाठी या कार्यालयात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दलालांची ओळख होत आहे़ दरम्यान दिवसभर संबंधित कर्मचारी कोणते काम करतात याविषयी प्रत्येक क्षण टिपले जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांत शिस्तीचे धडे पहायला मिळत आहे़ हा यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील धामणगाव तहसील कार्यालयात यशस्वी झाला आहे़
शासनाचा सर्वाधिक कर गोळा करण्याचे काम महसूल प्रशासनावर आहे़वाढती लोकसंख्या सोबतच तहसील कार्यालयात दिवसागणिक दोन ते तीन प्रकरण या कार्यालयात दाखल होते़ तहसील कार्यालयात पाणंद रस्त्यापासून तर सातबारा दुरूस्ती व कुळ हटविण्यापर्यंत प्रकरणे या कार्यालयात येतात़ या कार्यालयात दिवसेंदिवस दलालांची संख्याही वाढत आहे़ अर्जदार व गैरअर्जदार उपस्थित न राहता दलालच अनेक प्रकरणात पुढील तारीख घेण्याचे प्रकारही या कार्यालयात घडते़ त्यामुळे या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवूून कार्यालय प्रमुख व संबंधित प्रमुखांच्या कर्मचाऱ्यांवर हा कॅमेरा आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला होता़

Web Title: Be careful! CCTV at Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.