सावधान! चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हच्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:06 AM2021-01-24T04:06:40+5:302021-01-24T04:06:40+5:30
अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोना संसर्गाला हलक्यात घेणे आता महागात पडत आहे. या आठवड्यात कोरोना संसर्ग वाढला असल्याचे रुग्णसंख्येतून ...
अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोना संसर्गाला हलक्यात घेणे आता महागात पडत आहे. या आठवड्यात कोरोना संसर्ग वाढला असल्याचे रुग्णसंख्येतून स्पष्ट झाले आहे. चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हिटीच्या प्रमाणातही चांगलीच वाढ झालेली आहे. सहा दिवसांच्या चाचण्यांचा आढावा घेता, हे प्रमाण १२ टक्क्यांवर असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात २३ डिसेंबरपासून ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. ४ ते १५ जानेवारी दरम्यान प्रचार कालावधी, १५ ला मतदान व १८ ला मतमोजणी अशी ही प्रक्रिया राहिली आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पुरती वाट लागली. सर्वत्र गर्दी, फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. यामध्ये प्रशासनाद्वारे राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केवळ कागदोपत्री राहिल्यानेच आता कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली. प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचारी यांच्याच चाचणीची पडताळणी करण्यात आली. याउलट उमेदवार व त्यांचे एजंट, प्रतिनिधी यांच्या कोरोना चाचण्यांकडे निवडणूक विभागाने डोळेझाळ केली. याचे परिणाम आता समोर आले आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये आता कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला असल्याने चाचण्यांमध्ये अधिकाधिक वाढ करून उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.
बॉक्स
चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
दिनांक चाचण्या पाॅझिटिव्ह रुग्ण टक्केवारी
१६ जानेवारी ४१५ ७९ १९.३
१७ जानेवारी १४८३ ७१ ४.७८
१९ जानेवारी ४१५ ६७ १६.१४
२० जानेवारी ७५२ ९० ११.९६
२१ जानेवारी ६४८ ७१ १०.९५
२२ जानेवारी ००० ०० ०००
बॉक्स
शासनाद्वारे दररोज चार हजार चाचण्यांचे उद्दिष्ट
कोरोना संसर्गाला अटकाव व्हावा, यासाठी आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यास दररोज चार हजार चाचण्यांचे उद्दिष्ट यापूर्वीच देण्यात आले आहे. जिल्ह्यात मात्र आजपर्यंतही हे लक्ष्यांक पूर्ण करण्यात आलेले नाही. पूर्ण निवडणुकीतही दीड हजारांवर चाचण्या करण्यात
आलेल्या नाहीत. नागरिक चाचण्या करण्यास पुढे येत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पाईंटर
आजचे पॉझिटिव्ह ०००
एकूण कोरोनाग्रस्त ०००
आतापर्यंत मृत्यू ०००
एकूण संक्रमणमुक्त ०००