कोरोनामृतांचे अत्यंसंस्कार करताना खबरदारी बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:31+5:302021-04-16T04:13:31+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना जाणीवपूर्वक सर्व खबरदारी बाळगावी. ...

Be careful when cremating coronaries | कोरोनामृतांचे अत्यंसंस्कार करताना खबरदारी बाळगा

कोरोनामृतांचे अत्यंसंस्कार करताना खबरदारी बाळगा

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना जाणीवपूर्वक सर्व खबरदारी बाळगावी. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृत व्यक्तीला आणण्यासाठी स्वतंत्र प्रवेशव्दार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर, नातेवाईकांना उभे राहण्यासाठी शेड आदीसह कोरोना त्रिसूत्रीचे त्याठिकाणी काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी हिंदू स्मशानभूमी संस्थेला दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू स्मशानभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची व परिसराची पाहणी केली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, संस्थेचे अध्यक्ष आर. बी अटल यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाव्दारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात तसेच जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे. या आदेशांचे नागरिकांनी उल्लंघन करू नये. आपला तसेच आपल्या कुटुंबीयांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

बॉक्स

मोजक्याच नातेवाईकांना प्रवेश द्या

शहरातील सर्वच भागातील मृत व्यक्तींवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. आताची परिस्थिती पाहता कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांवरही हिंदू स्मशानभूमीतच गॅस दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराची सुविधा केली आहे. पण हा विधी पार पाडताना मृताच्या नातेवाईकांसह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी बाळगावी. मोजक्याच नातेवाईकांना प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले.

Web Title: Be careful when cremating coronaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.