ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:20+5:302021-09-15T04:16:20+5:30

अमरावती : सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. मॅट्रिमोनी वेबसाइट अर्थात लग्न जुळविणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ...

Be careful when looking for a mate online; Empty pockets before hands turn yellow | ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा

ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा

Next

अमरावती : सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. मॅट्रिमोनी वेबसाइट अर्थात लग्न जुळविणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. तरुणींना फसवून लग्नाच्या फसव्या बेडीत अडकवून त्यांची आर्थिक लुबाडणूकही केली जाते. कुणी मध्यस्थ एखाद्या तरुणाचा-तरुणीचा फोटो आणतो. फोटोवरून दोन्ही कुटुंबाची पसंती झाली की, बोलणी आणि नंतर शुभमंगल. लग्न जमविण्याची पद्धत हळूहळू कालबाह्य होऊ लागलीय. शहरात घरबसल्या वधू किंवा वराचा शोध घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. पण ऑनलाइन लग्न जमविताना सावधान! नाव एकाचे, फोटो एखाद्या देखण्या तरुणाचा, पत्ता खोटा आणि सरकारी नोकरी किंवा परदेशात राहत असल्याचे प्रोफाइल तयार करून तरुणींना फसविण्याचे प्रकार सुरू आहे. हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा होण्याचे प्रकारही अलीकडे वाढीस लागले आहे.

//////////////

अशी होऊ शकते फसवणूक

१) लग्न जुळवणाऱ्या संस्थांच्या दोन संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावाने प्रोफाइल तयार केली जातात. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणूक झालेल्या तरुणींमध्ये बहुतांश मुली शहरी भागातील असतात. मैत्रिणीने ऑनलाइन मुलगा पसंत केला म्हणून तरुणी घरच्यांपुढे अशाप्रकारे लग्न जमविण्याचा हट्ट धरतात.

२) विश्वास संपादन झाल्यावर वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागायचे, परदेशातून गिफ्ट पाठवले आहे. यात हिरे, दागिने, डॉलर्स आहेत. मात्र, हे गिफ्ट घेण्यासाठी तुम्हाला कस्टम ड्यूटी व इतर टॅक्स भरावे लागतील, असा बोगस कॉल येतो आणि होणाऱ्या पतीने पाठवलेल्या गिफ्टच्या नादात तरुणी लाखो रुपये गमावून बसतात.

///////////

ही घ्या काळजी

१) प्रामाणिकपणे लग्नाच्या प्रयत्नात असलेला तरुण प्रत्यक्षात भेटल्याशिवाय, कुटुंबाची ओळख आणि बोलणे झाल्याशिवाय पैशाची मागणी करू शकत नाही, हे तरुणींनी लक्षात ठेवायला हवे.

२) एखादा विवाहेच्छुक तरुण संपर्कात आला तर त्याची कल्पना कुटुंबीयांना द्या. ऑनलाईन लग्न जुळविताना काळजी घ्यायलाच हवी.

३) विवाह जुळविणाऱ्या साइटवर मागणी आल्यास त्याची माहिती कुटुंबीयांना द्यावी. संकेतस्थळावर ओळख झालेल्या पुरुषांची प्रत्यक्ष भेटून शहानिशा करावी.

४) सोशल मीडिया, मोबाइलच्या माध्यमातून मिळालेली छायाचित्रे त्याच व्यक्तीची आहेत की नाही ते पडताळून बघायला हवे. लग्नाचे किंवा मैत्रीचे आमिष दाखवून व्यवसायात भागीदार किंवा इतर कारणे देऊन कुणी पैशांची मागणी करीत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे.

///////////////

ऑनलाइन ओळखीनंतर प्रत्यक्षात न भेटता अडचणी किंवा अन्य काही बहाणा करून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत असेल तर पोलिसांना माहिती द्या. तरुणींनी स्वत:चा मोबाइल नंबर, घरचा पत्ता आणि छायाचित्रे, क्रेडिट, डेबिट कार्ड नंबर सोशल मीडियावर शेअर करू नये.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस

Web Title: Be careful when looking for a mate online; Empty pockets before hands turn yellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.