गावागावात युवकांसाठी व्यासपीठ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:56 PM2018-01-20T22:56:27+5:302018-01-20T22:56:55+5:30

To be a platform for the youth in the village | गावागावात युवकांसाठी व्यासपीठ व्हावे

गावागावात युवकांसाठी व्यासपीठ व्हावे

Next

यशोमती ठाकूर : कुऱ्हा महोत्सवाचे उद्घाटन, प्रतीक्षा लोणकरची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
कुºहा : कोणत्याही गावांचा विकास होत असताना, तेथील युवकांना महत्त्वाचा सहभाग असतो. कुऱ्हा तिवसा तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, येथील युवकांसाठी कुऱ्हा महोत्सव हे व्यासपीठ ठरू लागले आहे. याच धर्तीवर प्रत्येक गावात युवकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तिवस्याच्या आमदार व कुºहा महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केले.
शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यामातून ‘आपलं गाव आपला उत्सव : कुºहा महोत्सव’च्या उद्घाटन समारंभात आय ठाकूर बोलत होत्या. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण अडसड होते. यावेळी आमदार सुनील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, पंस सदस्य मंगेश भगोले, शिवराय कुलकर्णी, निवेदिता दीघडे, हमीद मामू, वाचनालयाचे अध्यक्ष गिरीधर रोडगे, सचिव विवेक बिंड, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानमोडे उपस्थित होते.
संविधानासह ग्रंथ दिंडी
२० ते २३ जानेवारी दरम्यान कुऱ्हा महोत्सवात कबड्डी स्पर्धा, योगासन वर्ग, एकता मॅरेथॉन, व्याख्यान, चालत बोलता, अंध मुलांचा आॅर्केस्ट्रा, स्लो सायकल स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, महिला मेळावा, रोगनिदान शिबीर, आधार दुरुस्ती शिबीर, मान्यवरांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, चित्रकला आदी उपक्रम होतील.

Web Title: To be a platform for the youth in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.