सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:34+5:30

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली.

Beans prices higher than guaranteed for the first time | सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

सोयाबीनला हमीपेक्षा प्रथमच अधिक भाव

Next
ठळक मुद्देदर चार हजार पार : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीओसीची वाढती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचा परिणामी स्थानिक बाजार समितीतही दिसून येत आहे. यंदाचे हमीभाव ३ हजार ७१० रुपये असताना आवक कमी व पावसामुळे मालाचा दर्जा घसरल्याने राणी प्रतीच्या सोयाबीनला बुधवारी ४२०० रुपये दर मिळाला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली. मात्र, पाऊस उसंतच घेईनात! गंजीतील सोयाबीन उन्हाअभावी कुजण्याच्या स्थितीत पोहोचला होता. काहींनी पावसाच्या मोसमातच सोयाबीन काढला. त्यामुळे ओला असताना काढलेला सोयाबीन तडण मिळू न शकल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना तो तशाच अवस्थेत विकावा लागला. जिल्ह्यात प्रत खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने काहींनी आधीच विकला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शासनाने जाहीर केलेला हमीभाव ३ हजार ७१० असताना आवकच्या तुलनेत सोयाबीनला सध्या ३९८१ ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

ढगाळ वातावरणाचा आवकवर परिणाम
यंदा भर पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला. उत्पादनही घटल्यामुळे भाव बºयापैकी मिळत आहे. बाजार समितीत मंगळवारी ६३९२ पोत्यांची आवक झाली. राणी स्वरुपाच्या सोयाबीनला ४२००, मध्यम दर्जाचा ४००० व हलका सोयाबीन ३९८१ असा दर बुधवारी मिळाला. त्यामुळे बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेरील शेतमाल विक्रीकरिता येत असतानासुद्धा गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याचे अडते संचालक प्रमोद इंगळे यांनी सांगितले.

१७२ शेतकऱ्यांचा शेतमाल तारण
सध्या भाव जरी चांगला असला तरी यंदा सोयाबीनची आवक घटल्याने भविष्यात वाढीव दराचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांनी चांगला सोयाबीनचा ७ हजार ९९० क्विंटल माल विक्रीऐवजी तारण ठेवला आहे. त्यावर एक कोटी ६८ लाख ८१ हजार ९०० रुपये कर्ज संबंधित शेतकºयांनी उचलल्याची माहिती शेतमाल तारण विभागप्रमुख पवन देशमुख यांनी दिली.

डीओसीच्या उत्पादकेवरून ठरतेय सोयाबीनचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर डीओसीच्या उत्पादकतेवरून ठरतात. जसे की ३० टक्के तेल काढल्यानंतर त्या सोयाबीनच्या पेंडापासून जे - जे पदार्थ तयार करण्याची क्षमता असते, त्यावरून सोयाबीनचे दर ठरतात. डीओसीद्वारा सोयाबीनचे दर वाढले असून, पुढे आणखी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास घाई करू नये, असा सल्ला संचालक विकास इंगोले यांनी दिला आहे.

Web Title: Beans prices higher than guaranteed for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार