चिखलदऱ्याच्या वन उद्यानात पोहोचले अस्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:34+5:302021-02-11T04:14:34+5:30
चिखलदरा लोकमत न्यूज नेटवर्क येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ एकादी पाड अस्वलाने रवीवारी रात्री पर्यटकांसह स्थानिकांनाही ...
चिखलदरा लोकमत न्यूज नेटवर्क
येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ एकादी पाड अस्वलाने रवीवारी रात्री पर्यटकांसह स्थानिकांनाही दर्शन दिले, परिसरात अस्वलांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी आणि अन्नाच्या शोधात अस्वल पर्यटन नगरीत धुमाकूळ घालतात
चिखलदरा परिसरातील वैराट, चूरणी, मेमना पस्तलाई आदि काही गावांचे पुनर्वसन झाले आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवती कुरण निर्माण करण्यात आल्याने रानगवे हरण ,सांबर अश्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे जंगल सफारी साठी जाणाऱ्या पर्यटकांना वाघोबाचे दर्शन पूर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे चिखलदरा व परिसरात अस्वलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे रविवारी रात्री वन उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भटकत आलेले अस्वल परिसरात चर्चेचा विषय ठरले असून सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे वन उद्यानात मोठ्या प्रमाणात आता पर्यटक भेटी देऊ लागले आहेत त्यामध्ये बालकांसह मोठ्यांना आकर्षित करणारे विविध उपक्रम तयार करण्यात आले आहे
बॉक्स
अन्न पाण्याच्या शोधात कि, अचानक भरकटले?
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात परिसरातील आदिवासी पाड्यात सह चिखलदरा पर्यटन स्थळावर अस्वल अन्न पाण्याच्या शोधात धुमाकूळ घालतात अस्वलांचे हमले आदिवासी नागरिकांवर सुरूच राहतात अशात रविवारी अप्पर प्लेटो स्थिती वन उद्यानाच्या प्रवेश द्वाराजवळ भरकटलेले अस्वल काहीतरी खाण्याच्या शोधात बराच वेळ पर्यंत इकडून तिकडे फिरत होते त्याच्या प्रत्येक हालचालींवर वाहनात मूग गिळून बसलेले पर्यटक आणि काही नागरिक लक्ष देत होते काही वेळानंतर हे अस्वल जंगलात निघून गेले
कोट
जंगलात मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार केल्याने पाण्याची मात्रा आवश्यक खाद्य सुद्धा भरपूर आहे, अचानक फिरत ते अस्वल भरकटले असावेत, चिखलदरा परिसरात अस्वलांची संख्या अधिक आहे
राजकुमार पटवारी
सहाय्यक वनसंरक्षक
गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा