जन्मदात्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:37+5:302021-08-17T04:19:37+5:30

विविध जातीचे वृक्षरोपण फोटो पी १६ धामणगाव धामणगाव रेल्वे : आपल्या जन्मदात्याचे उपकार फेडता येत नाही. मात्र, ...

Beautification of the cemetery in memory of the deceased | जन्मदात्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण

जन्मदात्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण

Next

विविध जातीचे वृक्षरोपण

फोटो पी १६ धामणगाव

धामणगाव रेल्वे : आपल्या जन्मदात्याचे उपकार फेडता येत नाही. मात्र, त्यांनी केलेल्या समाजसेवेची आठवण पिढ्यांपिढ्या रहावी, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्यांने आपल्या जन्मदात्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीच सौंदर्यीकरणासाठी दत्तक घेऊन यात विविध प्रजातींचे वृक्षारोपणाचा वसा घेतला आहे.

तालुक्यातील विरुळ रोंघे येथील रहिवासी माजी ग्रामपंचायत सदस्य मुन्ना ऊर्फ दीपक देशमुख यांनी आपल्या गावात अनोखा उपक्रम राबविला. त्यांच्या आईचे पाच वर्षांपूर्वी तर गतवर्षी वडिलांचे निधन झाले. म्हणून दीपक देशमुख यांनी गावातील स्मशानभूमी सौंदर्यीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दत्तक घेतली. तेथे विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे, सरपंच रुपेश गुल्हाने, माजी ग्रा.पं. सदस्य दीपक देशमुख, प्रशांत वानखडे, भारत रोंघे, प्रमोद रोंघे, प्रकाश रोंघे, उपसरपंच गोपाल मांडुळकर, मंगेश गुल्हाने, शिवदास बुगल, सुभाष काळे पुष्पा डंबडे, वैशाली राऊत, राधिका रोंघे, प्रेमलता वर्मा, माधुरी रोंघे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Beautification of the cemetery in memory of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.