स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:45 PM2017-11-03T23:45:16+5:302017-11-03T23:46:11+5:30

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गंत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

Beautification of sanitaryhouses | स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण

स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण

Next
ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात मोहीम : देखभाल, व्यवस्थापनाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गंत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येणाºया या मोहिमेदरम्यान स्वच्छतागृहांची दुरुस्ती, देखभाल व व्यवस्थापनही केले जाईल.
राज्यातील संपूर्ण नागरी भाग हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले असले तरी शहरांमधील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्थिती चांगली नसल्याचे निरीक्षक नगरविकासने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सामुदायिक, सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्ती, व्यवस्थापन व सुशोभीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांची सद्यस्थितीची पाहणी करून त्याची जिओ टॅगिंग छायाचित्रे काढायची आहेत. त्यामुळे ६ ते १२ नोव्हेंबरच्या पाहणीदरम्यान आढळून आलेल्या स्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्त्या करून घेण्यासाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार करून त्याला मान्यता घेण्याचे निर्देश आहेत. १३ ते २२ नोव्हेंबर दरम्यान मोहिमेचे महत्त्व विचारात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता द्यावी, २३ ते ३० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक बाबींसाठी निविदा काढता येतील, तर १ ते ३१ डिसेंबर दरम्यान अशी कामे पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झालेल्या कामांची जिओ टॅग छायाचित्रे काढून ठेवण्याचे निर्देश नगरपालिका, महापालिका व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत.

परिसरात काँक्रिटीकरण
शहरातील नागरिकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी व नागरिकांनी सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे अभिप्रेत आहे. त्यांचा वापर नियमितपणे करण्यासाठी अशा स्वच्छतागृहास रंग द्यावा, चिखल होवू नये यासाठी जाण्या-येण्याच्या मार्गावर काँक्रीटीकरण करण्यात येईल.

असा होईल खर्च
स्वच्छ भारत अभियानावर खर्च करण्यासाठी राखून ठेवलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या ५० टक्के निधीतून या मोहिमेवर खर्च करण्यात येईल. याशिवाय १४ वा वित्त आयोगाचा प्रोत्साहन निधी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वनिधी वापरण्यात येईल.

Web Title: Beautification of sanitaryhouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.