तीन दिवस आकाशात ग्रहांचे सुंदर संयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:02 AM2021-01-05T04:02:58+5:302021-01-05T04:02:58+5:30
अमरावती : आकाशात ९, १० व ११ जानेवारी रोजी गुरू, शनी आणि बुध ग्रहांचे अद्वितीय संयोजन पाहायला मिळणार आहे. ...
अमरावती : आकाशात ९, १० व ११ जानेवारी रोजी गुरू, शनी आणि बुध ग्रहांचे अद्वितीय संयोजन पाहायला मिळणार आहे. या तिन्ही दिवशी हे ग्रह पश्चिमेला आकाशात त्रिकोण करतील.
सूर्यास्त ते सायंकाळी ६.४५ पर्यंत असे साधारण एक तास सदर ग्रहांचे अवलोकन करता येईल. प्रत्यक्षात हे सर्व ग्रह एकमेकांपासून बरेच दूर आहेत. ते ठळक दिसणार नाहीत. परंतु, तेजस्वी ग्रह गुरू (-१.९), बुध (-९.९) शनी (०.६) सह दृशप्रत असलेले पाहणे हे एक अद्वितीय दृश्य असेल. ११ जानेवारी रोजी बुध व गुरू ग्रह एकाच दृष्टिक्षेपात दिसू शकतात. कारण दोन्ही १.५ अंशाच्या आत असतील. ज्यांच्याकडे दुर्बीण नाही, ते साध्या डोळ्यांनीदेखील हा ग्रहांचा मेळा पाहू शकतील, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदद्वारे संचालित स्टार गेझर क्लबचे प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.