कंट्रोलरुमकडे बेड, ई-पाससाठी सर्वाधिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:51+5:302021-07-15T04:10:51+5:30
अमरावती : कोरोना काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात आतापर्यंत ५,१०० कॉलची नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक कॉल कोरोना हॉस्पिटलमध्ये ...
अमरावती : कोरोना काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात आतापर्यंत ५,१०० कॉलची नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक कॉल कोरोना हॉस्पिटलमध्ये बेड तसेच लॉकडाऊनचे काळात ई-पासासाठी आलेल्या आहेत. याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता आदी संदर्भात तक्रारी आल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली. कोरोनाचा संसर्ग कमी होताच महसूल प्रकरणांच्या तक्रारींची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली व नागरिकांच्या सुविधेसाठी १८००२३३६३९६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांना उपलब्ध केला होता. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा कक्षही यालाच जोडला होता. त्यांचा दूरध्वनी क्रमांक २६६२०२५ असा आहे. कोरोना काळात बहुतांश काळे याच कक्षाच्या माध्यमातून केली गेली. नंतर प्रमुख विषयांशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणाचे व नागरिकांच्या अडचणी सोडविण्याची कामे केल्या गेली.
कोरोना काळात असलेल्या चढ-उतारनुसार या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉलचे व समस्यांचे स्वरुप बदलते राहिले आहे.
जिल्ह्यात मार्च २०२० पासून नियंत्रण कक्ष/ वॉर रुम स्थापित करण्यात आला. या कक्षात काही नियमित तर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येत आहे. आता सर्वाधिक तक्रारी लसीकरण संदर्भात असल्याची माहिती या कक्षाने दिली.
बॉक्स
लस मिळत नाही, उपलब्ध कुठे?
१)दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. त्यादरम्यान जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची रोजची नोंद १२०० पर्यंत पोहोचली होती. कोरोना हॉस्पिटल फुल्ल असल्याने बेड उपलब्ध कुठे यासंदर्भात सर्वाधिक कॉल आलेत.
२) आता लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर सकाळपासून रांगा लागत असल्याने कित्येक नागरिकांना माघारी परतावे लागते, लस मिळत नाही, कुठे उपलब्ध आहे. याची माहिती संदर्भात सध्या कॉल वाढले आहेत.
बॉक्स
जिल्ह्याबाहेर जायचे, ई-पास कुठे मिळणार
१) जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी ई-पास आवश्यक आहे. अशावेळी सर्वाधिक कॉल, तक्रारी याच संदर्भात आले. ई-पास कुठे मिळणार, साईट कोणती, काय कागदपत्रे आवश्यक आहेत, आदींची माहिती या क्रमांकावर नागरिकांना देण्यात येऊन त्यांचे समाधान करण्यात करण्यात आले.
२) याशिवाय महसूल विभागाशी संबंधित तक्रारी व कॉल आलेत. यात पांदण रस्त्याच्या अडचणी, फेरफार, भूसंपादन आदीच्या तक्रारी संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात आल्या. शिवाय कोरोना विषयक आलेल्या तक्रारी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आल्याचे या कक्षप्रमुख डेविड चव्हान यांनी सांगितले.
पाईंटर
आतापर्यंत प्राप्त तक्रारी : ५,१००
आरोग्य विभाग : ३,४३०
महसूल व अन्य विभाग : १,६७०
कोट
कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कक्षाची स्थापना करण्यात आली. यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन नागरिकांचे समाधान करण्यात आले. संबंधित विभागाकडे तक्रारी पाठविण्यात आलेल्या आहेत.
- सुरेंद्र रामेकर,
कंट्रोल रुमप्रमुख