रस्त्यावरच बिअरबारचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:16 PM2017-09-02T23:16:50+5:302017-09-02T23:17:05+5:30
शहरात पोलीस आयुक्तांच्या नाईट राऊन्डमुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे. या नाईट राऊन्डदरम्यान पोलीस आयुक्तांना शहरातील काही घडमोडी आश्चर्यचकीत करणाºया आढळून आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात पोलीस आयुक्तांच्या नाईट राऊन्डमुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे. या नाईट राऊन्डदरम्यान पोलीस आयुक्तांना शहरातील काही घडमोडी आश्चर्यचकीत करणाºया आढळून आल्या आहेत. गॅलेक्सी बारने टाऊन प्लॅनिंगच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्किंग गिळंकृत केली, तर शुक्रवारी नाईट राऊन्डवेळी फे्रजरपुरा हद्दीतील नंदीनी बारसमोरील रस्ताच गिळंकृत झाल्याचे सीपींच्या निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर काही तरुण दुचाकीवर बसून चक्क रस्त्यावरच बिअरबारचा ढोसताना आढळलेत.
शहरात सीपींच्या नाईट राऊन्डमुळे त्यांच्या अधिनस्त यंत्रणेची पोलखोल होत आहे. अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय, अवैध पार्किंग व वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले आहे.
शुक्रवारी रात्री सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी फे्रजरपुरा व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणी फेरफटका मारला. दरम्यान प्रशांतनगर बगिच्याजवळील अवैध पार्किंगसंदर्भात तेथील चायनीज व्यावसायिकांना ताकिद दिली. फरशी स्टॉपनजीक एका बिअर शॉपीवर कारवाई केली. कंवरनगरातील एका पानटपरीवर अवैध दारू मिळाली, तर पानटपरीसमोर अस्तव्यस्त स्थितीत पार्किंग दिसून आली. सीपींनी पानटपरीमालकाची कानउघाडणी करून त्याला तंबी दिली. त्याचप्रमाणे एका आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात दारुचा माल आढळून आला असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान नंदिनी नामक बिअर शॉपीसमोरील रस्त्यावर काही तरुण दुचाकीवर बसून मद्यप्राशनाचा आनंद घेताना आढळून आले. त्यांना कोणाचेच भय नसल्याचे दिसून येत होते. भर रस्त्यावरच असे प्रकार होत असल्याचे सीपींना आश्चर्य वाटले. गेल्या सहा दिवसांत सीपींनी शहरात घेतलेल्या आढाव्यामध्ये संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाºया पोलीस गस्तीचा कारभार उघड झाला.
फे्रजरपुरा हद्दीतील एका ठिकाणी काही युवक रस्त्यावरच दुचाकी लावून दारू ढोसत होते. बिअर शॉपी मालक रस्त्याचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याचे दिसून आले. त्या रस्त्याविषयी माहिती मागिवली असून रस्ताच गिळंकृत करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त