रेल रोको आंदोलना पूर्वीच कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात, संविधान आर्मीने दिला होता इशारा
By गणेश वासनिक | Published: May 1, 2023 06:47 PM2023-05-01T18:47:29+5:302023-05-01T18:48:13+5:30
रेल्वे का निजीकरण नही चलेगा नही चलेगा अशी नारेबाजी करण्यात आली सदर ठिकाणी स्टेशन मास्तर यांना आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बडनेरा : विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीने सोमवारी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना प्लॅटफॉर्म चढण्याआधीच ताब्यात घेतले हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आंदोलनातून अडविल्या जाणार होती रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी सुनियोजित कट रचून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घ्यावेत यासह ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या, ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी, रेल्वेचे खाजगीकरण बंद करा, तसेच सरकारी पब्लिक सेक्टर चे खाजगीकरण देखिल बंद करावे, केंद्र सरकारने 18 रेल्वे स्टेशनचे नाव बदलले तेव्हा दादर रेल्वे स्टेशनचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असे नामांतर केल्या जावे यासह इतरही बऱ्याच मागण्यासाठी संविधान आर्मीच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्याआधीच रोखले रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता बॅरिकेट लावण्यात आले होते पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविल्यानंतर तेथे नारेबाजी करण्यात आली बंद करो रेल्वे बेचना बंद करो, रेल्वे का निजीकरण नही चलेगा नही चलेगा अशी नारेबाजी करण्यात आली सदर ठिकाणी स्टेशन मास्तर यांना आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, राकेश बग्गन, धनराज गोळे, भिवा चोपडे, संघपाल कीर्तीकर सतीश ढाकणे, शशी तायडे, रवींद्र वाघमारे यासह इतरही आंदोलनकर्ते होते पोलीस सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक नितीन मगर, रेल्वे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक उमेश मुंढे, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यासह मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात होते.