भीक मांगो आंदोलनाची दिंडी पोहोचली अमरावतीत
By admin | Published: December 6, 2015 12:15 AM2015-12-06T00:15:08+5:302015-12-06T00:15:08+5:30
विनाअनुदानित शाळा व वर्गतुकड्यांना अनुदान मिळण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.
श्रीकांत देशपांडेंचे नेतृत्व : १० हजार शिक्षक विधानभवनावर धडकणार
अमरावती/बडनेरा : विनाअनुदानित शाळा व वर्गतुकड्यांना अनुदान मिळण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे. ही दिंडी शनिवार ५ डिसेंबर रोजी अमरावतीत आली. संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजार शिक्षक हिवाळी अधिवेशनावर यातूून धडकणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पोराला चिमटा घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २२ हजार शिक्षकांना अनुदान मिळावे, याकरिता १ डिसेंबर पासून शेगावहून नागपूरसाठी पायदळ दिंडी निघाली आहे. याला भीक मांगो आंदोलन म्हणून संबोधण्यात आले आहे. शेगावपासून या आंदोलनाला सुरूवात करताना अनुदान मिळत नसणारे ५ हजार शिक्षक येथे जमले होते. या दिंडीचे नेतृत्व शिक्षक मतदार संघाचे आ. श्रीकांत देशपांडे, पुण्याचे आ. दत्ता सावंत, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर करीत आहे. ४ डिसेंबर रोजी ही दिंडी बडनेऱ्यात पोहोचली, आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने आम्हाला सामाजिक बांधिलकी म्हणून एक रुपया भीक द्या. तोपर्यंत अनुदानाचा निर्णय घेणार नाही, तोपर्यंत अशा पध्दतीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आ. श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. यावेळी सैय्यद राजीक, विलास राऊत, नीलेश देशमुख, सुभाष धोटे, विजय नागपूरे, सदीप पाचपोरे, वकील दानीश आनंद इंगोले, प्रदीप सिंघई, मिलिंद चिरडे, भाष्कर सुपारे, समाधान गाडगे आदी उपस्थित होते.