जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:35 PM2018-12-07T21:35:24+5:302018-12-07T21:36:08+5:30

स्थानिक राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी उद्घाटन केले.

Beginning of district level revenue sports competition | जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेस सुरुवात

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेस सुरुवात

Next
ठळक मुद्देनऊशेवर कर्मचारी सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी उद्घाटन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, आरडीसी नितीन व्यवहारे, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, एसडीओ व्यंकट राठोड, मनोहर कडू, विनोद शिरभाते, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, अभिजित नाईक, इब्राहिम चौधरी, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, महसूल संघटनेचे गजेंद्र मालठाणे, नामदेव मेटांगे, नामदेव गडलिंग, शेषराव लंगडे, अरुण झाकर्डे, किशोर चौके, किशोर राठोड, राजेश भांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व्यंकट राठोड यांनी केले. शनिवारपर्यंत चालणाºया महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेत नऊशेपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी राजा शिवाजी विद्यालय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नृत्य मनोवेधक ठरले. स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक प्रदीप खडके, सुरेश बोंडे, हितेंद्र नाकील, योगेश अमृतकर, महेश शेरेकर, निकेश शिंगणे, सुनील पांडे, अभी मेहरा, साजिद आदी हे क्रीडा शिक्षक पंच आहेत. कबड्डी सामन्याच्या शुभारंभावेळी जिल्हाधिकारी यांनी अचलपूर संघाकडे एन्ट्री केली. मात्र, ते प्रतिस्पर्धी संघाला चकमा देत बाहेर पडले. त्यांची कबड्डीची एन्ट्री लक्षवेधक ठरली.

Web Title: Beginning of district level revenue sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.