पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 04:16 PM2021-08-16T16:16:17+5:302021-08-16T16:16:43+5:30

Amravati News मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन "गाढव" आहे.

The beginning of the Magha Nakshatra; Crop conditions will remain good | पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील

पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात; पिकांची स्थिती चांगली राहील

googlenewsNext
ठळक मुद्देया नक्षत्रात बेताचाच पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन "गाढव" आहे.

             सूर्याच्या नक्षत्रकालीन प्रवेश वेळेतील ग्रह स्थितीनुसार, या नक्षत्रात पिकांना मानवनाऱ्या सार्वत्रिक पावसाचे योग दिसून येतात. परंतु या नक्षत्रातही बेताचाच पाऊस असेल. परंतु, पिकांची स्थिती चांगली असेल. या नक्षत्राचे पहिले व दुसऱ्या चरणात अर्थात १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत.

             मागच्या आश्लेषा नक्षत्रात आभाळ आभ्राच्छादित राहिले, पण पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी मागील नक्षत्रातील १४ दिवस, पावसाविनाच गेले. याचा सोयाबीन पिकाला फटका बसला. या आधी मृगाचे वाहन ही "गाढवाचं" होते. त्यावेळी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे "मघा" नक्षत्रातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. परंतु मघा नक्षत्रासाठीच्या "आला तर मघा - नाही तर वरते बघा". या प्रचलित म्हणीप्रमाणे हे नक्षत्र चांगले बरसते की, पावसासाठी आकाशाकडे बघायला लावते हे येणारा काळच सांगू शकेल. शेतकरी नेहमीच आशेवरच जगत असतो. त्यामुळे शेतकरी या नक्षत्रात चांगल्या पावसाची मागणी  देवाजवळ करीत आहे.

Web Title: The beginning of the Magha Nakshatra; Crop conditions will remain good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.