नांदगाव तालुक्यात १० शाळांमध्ये वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:32+5:302021-07-16T04:10:32+5:30
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील आठवी ते बारावीच्या ३४ शाळांपैकी १० शाळांमध्ये गुरुवारी सत्र २०२१-२२ ची पहिली घंटा वाजली. शाळांमध्ये ...
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील आठवी ते बारावीच्या ३४ शाळांपैकी १० शाळांमध्ये गुरुवारी सत्र २०२१-२२ ची पहिली घंटा वाजली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाल्याने कोरोनामुळे पसरलेली मरगळ दूर झाली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फुलआमला व मंगरूळ चव्हाळा ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतचा ठराव घेतला आहे, तर धानोरा गुरुव, माहुली चोर, नांदसावंगी, सालोड, वेणी गणेशपूर, पिंपळगाव निपाणी, जनुना, दाभा या विद्यालयांत पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी जनुना येथील अभिनव विद्यालयत सर्व शिक्षक उपस्थित होते. ४० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी होती, असे मुख्याध्यापिका अनुजा ब्राह्मणे यांनी सांगितले.
--------------
दहा शाळा आज सुरू झाल्याची माहिती मुख्याध्यापकांकडून घेण्यात आली. तालुक्यातील १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- कल्पना ठाकरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नांदगाव खंडेश्वर