५० कोटीतून होणार बेलोरा विमानतळाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:03+5:302021-09-25T04:13:03+5:30
अमरावती : केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बेलोरा विमानतळ विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला ...
अमरावती : केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बेलोरा विमानतळ विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसे पत्र त्यांनी खासदार नवनीत राणा यांना पाठविले आहे. यापूर्वी बेलोरा विमानतळ विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला ७५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, त्याचा वास्तविक कार्य अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र राज्य सरकारने केंद्राला न दिल्याने उर्वरित निधी रखडला होता.
वर्षानुवर्षे रखडलेल्या बेलोरा विमानतळाचा विकास होऊन तेथून दिवसा व रात्री विमान उड्डाण व्हावे, यासाठीच खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली येथे ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. बेलोरा विमानतळाच्या धावपट्टी, नाईट लँडिंग सुविधा, टर्मिनल बिल्डिंग, प्रवासी आवागमन कक्ष, कॅफेटोरिया,पार्किंग आदींसाठी ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. राणा यांच्या मागणीनुसार ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.