बेलोरा विमानतळाला मिळाले सात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:48+5:30

सामान्य प्रशासन विभागाने ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयान्वये राज्यात चार विमानतळांच्या प्रस्तावित विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला. यात बेलोरा विमानतळाला सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विमानतळाची निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी पुरवणी मागणीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Belora Airport receives Rs 7 crore | बेलोरा विमानतळाला मिळाले सात कोटी

बेलोरा विमानतळाला मिळाले सात कोटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रगतिपथावर असलेल्या विकासासाठी पुरवणी मागणीनुसार सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाने हा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयान्वये राज्यात चार विमानतळांच्या प्रस्तावित विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला. यात बेलोरा विमानतळाला सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विमानतळाची निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी पुरवणी मागणीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बेलोरा विमानतळाचे केवळ जळू ते निंभोरा पोचरस्ता व संरक्षणभिंतीचे काम पूर्ण झाले आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण, वाहनतळ, अ‍ॅप्रॉन रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे रूंदीकरण, बडनेरा मार्गाला जोडणारा वळणरस्ता, स्वतंत्र पाणीपुरवठा, जनुना येथे विमानतळासाठी विद्युत उपकेंद्रांचे बांधकाम आदींची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
विमानतळाची धावपट्टी १८५० मीटर केली जाणार आहे. नाइट लँडिंगकरिता स्वतंत्र व्यवस्था, टॉवर निर्मिती आदी कामे पूर्णत्वासाठी शासनाने १२५ कोटींचा निधीला मान्यता प्रदान केली आहे. मात्र, निधी मंजूर नसल्याने काही कामे रखडली असल्याचे अहवालात नमूद होते. धावपट्टीच्या विस्ताराची कामे निधी अपुरा पडत असल्याने सुरू करता येत नव्हती. आता सात कोटी मिळाल्याने विमानतळाची कामे वेग घेतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Belora Airport receives Rs 7 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.