महापालिकेतील लेटलतिफांवर कारवाईचा दंडुका
By admin | Published: March 1, 2017 12:05 AM2017-03-01T00:05:09+5:302017-03-01T00:05:09+5:30
महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे....
प्रशासकीय आचारसंहिता अनिवार्य : ‘थम्ब’वर नजर
अमरावती : महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे.त्यासाठी आयुक्तांनी थंब मशिनचा संपुर्ण डाटा मागविला आहे.वेळोवेळी निर्देश देऊनही तालावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगळी यादी तयार होत आहे.महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे.त्या अनुषंगाने आयुक्त हेमंत पवार यांनी कडक पवित्रा घेतला आहे.
आयुक्त दर सोमवारी सकाळी १० वाजता विभागप्रमुखांची बैठक घेतात
.मात्र त्या बैठकीलाही अनेक विभागप्रमुख दांड्या मारतात तर काही जण उशिरा येतात.ही बाब लक्षात येताच त्यांनी अशा लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांना शो कॉज दिल्या होत्या .त्यानंतर काही दिवस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी १० ते ६ ची वेळ पाळली.मात्र आता पुन्हा महापालिकेत येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सामान्य प्रशासन विभाग,लेखा विभाग ,आरोग्य विभाग,बांधकाम विभाग आणि एडीटीपी मधील काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.दांडीबहाद्दराची संख्या बांधकाम विभागात अधिक आहे.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सकाळी १० वाजता अतिशय सामसूम असते.त्यावरून पाचही झोन कार्यालयातील उपस्थितीची कल्पना न केलेलीच बरी.सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्येक विभागातील एक एक कर्मचारी हळू हळू कार्यालयाबाहेर निघू लागतो.दुपारी २ ला घरी जेवणास गेलेले कर्मचारी महापालिकेत केव्हा परततात ,याचा आढावा घेतल्यास आयुक्तांच्या पुढे भासविण्यात येणारे चित्र किती तकलादू आहे,हे स्पष्ट होईल.
(प्रतिनिधी)
बायोमेट्रिक बनल्यात शोभेच्या वस्तू
४महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह दवाखाने ,बाजार परवाना विभाग व अन्य काही ठिकाणी बायोमॅट्रीक यंत्र लावण्यात आले आहेत.मात्र मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही थंब मशिनचा डाटा सिस्टिममॅनेजर पर्यंत पोहोचविला जात नाही.अजूनही थंब मशिनचा डाटा प्रमाणभूत मानून वेतन काढले जात नाही.त्यामुळे अनेक कर्मचारी बायोमॅट्रीक मशिनमध्ये ‘थंब ’ करीत नाहीत.