निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पायपीट

By admin | Published: June 13, 2016 01:24 AM2016-06-13T01:24:35+5:302016-06-13T01:24:35+5:30

तालुक्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अक्षरश:

Beneficiaries of unfounded scheme | निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पायपीट

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पायपीट

Next

धारणी तालुका : खात्यात पैसे नसल्याची वृद्धांची ओरड
धारणी : तालुक्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अक्षरश: तहसील कार्यालयाचे ओटे झिजवावे लागत आहे. दररोज वृद्धांची बँक खात्यात पैसे नसल्याची ओरड होऊन तहसील कार्यालयात फिर्याद करावी लागत आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे व अनियमिततेमुळे या प्रकरणांचा निकाल काढणे तहसीलदारांना कठीण झाले आहे.
दुसरीकडे आवश्यक दस्तऐवज सादर केले नाही, म्हणून अनेकांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य झाले नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या योजनेतील भ्रष्टाचार व गैरप्रकारामुळे एका नायब तहसीलदाराला घरी जावे लागले होते. तेव्हापासून सरसकट पूर्ण योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करून चौकशी सुरू झाली होती. या चौकशीत योजनेत लागणारे आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केल्याशिवाय लाभ देण्यात येणार नाही, अशी ठोस भूमिका नायब तहसीलदारांनी घेतले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वयाचे प्रमाण दाखविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) नसल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असल्याचा दाखला, आधारकार्डची प्रत, ओळखपत्राची प्रत, रहिवासी दाखला, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची प्रत या सर्व दस्तावेजांची पूर्तता करणे अनिवार्य केले आहे. त्यानंतरच हे प्रकरण आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)

नियमांना बगल दिल्याने वाढली समस्या
याप्रकारे संपूर्ण दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतरच प्रकरणावर शिक्कामोर्तब करण्यात येते. परंतु संजय गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ योजनेत दस्तऐवजांची पूर्तता न करता दलालांची साखळी तयार झाली. आधार कार्ड व बँक पासबुकच्या आधारे लाभार्थ्यांना पात्र ठरवून योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे अपात्र व कमी वयाच्या सुद्धा यात घेवाण-देवाण करून सहभागी करण्यात आले आणि नियमांना बगल देण्यात आल्याने तक्रारी वाढल्यात.

बोगस लाभार्थ्यांमुळे पात्र लाभार्थी वंचित
४या बोगस लाभार्थ्यांची होणारी वारंवार तक्रार व चौकशीमुळे पात्र लाभार्थी भरळले जात आहे. चौकशी सुरू असल्याने सर्वांचे अनुदान थांबविले जात आहे. यात कोण बोगस व कोण पात्र लाभार्थी यातील फरक जाणून घेण्यात अधिकारी वर्गात संभ्रम निर्माण झाल्याने सद्या धारणीत केवळ आणि केवळ श्रावणबाळ योजनेतीच चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे धारणी केवळ श्रावणबाळ योजना सुरू आहे, असे म्हटले जात आहे.

Web Title: Beneficiaries of unfounded scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.