गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व गावांना समप्रमाणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:00 AM2020-12-25T05:00:00+5:302020-12-25T05:01:07+5:30

याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.

Benefit of Gurukunj Upsa Irrigation Scheme to all villages equally | गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व गावांना समप्रमाणात

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व गावांना समप्रमाणात

googlenewsNext
ठळक मुद्दे यशोमती ठाकूर, १७,५६७ एकर शेतीचे सिंचन, २५० कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ७ हजार १०९ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या व सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावांतील शेतीला समप्रमाणात होणार आहे, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.
मोर्शी स्थित अप्पर वर्धा धरणाच्या तिवसा तालुक्यातून गेलेल्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या हेतूने गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास येत आहे. त्यासाठी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. 
याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.
माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना धरणाचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अप्पर वर्धा धरण प्रकल्प प्रशासनाने सर्वेक्षणसुद्धा केले होते. तथापि, ज्या गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती, ती गावे उंच भागावर, तर कालवा सखल भागात असल्याने कालव्यातून पाणी देण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेतकरीहितासाठी कायम कटिबद्धता ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील हक्कासाठी सातत्याने भूमिका मांडली. विधिमंडळात पाठपुरावा केला. त्यानुसार ‘मोझरी गुरुकुंज उपसा सिंचन योजना’ आकारास आली, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 
तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भरघोस शेती उत्पादन घेण्याचा ‘स्पार्क’ आहे.  ही योजना त्यांच्या परिश्रमाचे चीज करेल, अशी अपेक्षा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. 

जलसंपदा मंत्र्यांसोबत लवकरच बैठक
योजनेची चाचणीसुद्धा पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते यावर्षी ३१ जुलै रोजी घेण्यात आली. पंप हाऊस व इतर सर्व कामे झाली, तर वितरणाची पन्नास टक्के काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा होत आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विशेष बैठक लवकरच होणार आहे. यावेळी सर्व अडचणी दूर करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहितीही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.

Web Title: Benefit of Gurukunj Upsa Irrigation Scheme to all villages equally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.