कोरोनाच्या दोन्ही लसी बेस्ट, पुरवठा कोविशिल्डचा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:20+5:302021-06-23T04:10:20+5:30

(असाईनमेंट) अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या ...

Best of both corona vaccines, more of the supply Covishield | कोरोनाच्या दोन्ही लसी बेस्ट, पुरवठा कोविशिल्डचा जास्त

कोरोनाच्या दोन्ही लसी बेस्ट, पुरवठा कोविशिल्डचा जास्त

Next

(असाईनमेंट)

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण ११९ केंद्रांवर होत आहे. पाच टप्प्यात आतापर्यंत ५,५९,६७३ नागरिकांचे लसीकरण झालेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

कोरोना लसीकरणासाठी दोन्ही लसी परिणामकारक आहे. कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ॲस्ट्राझेनिका या औषध कंपनीच्या साहाय्याने विकसित केली आहे. याच लसीपासून भारतात पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. याशिवाय कोव्हॅक्सिन ही लस भारतीय बनावटीची आहे. ती हैद्राबादच्या भारत बायोटेक या कंपनीद्वारे इंडियन कौसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूटऑफ व्हायरॉलॉजी या संस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात प्रामुख्याने मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात लसीकरणाबाबत गैरसमज होते. मात्र, प्रशासनाद्वारे सातत्याने जागृती करण्यात येत असल्याने या भागात आता लसीकरणाचा टक्का वाढला आहे. या भागात आता ७० पथकांद्वारे लसीकरण करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

कोविशिल्डचा पुरवठा जास्त

जिल्ह्यात लसींचा ज्या प्रमाणात पुरवठा होतो, त्यानुसार आरोग्य विभागाद्वारे लसी संबंधित केंद्रांवर पुरविण्यात येतात. जिल्ह्यात आतापर्यंत ५,७६,६४० लसींचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये कोविशिल्ड ४,५२,६३० व कोव्हॅक्सिनच्या १,२४,०१० डोसचा समावेश आहे. साहजिकच कोविशिल्डचा पुरवठा जास्त असल्यामुळे ४,४८,६६४ नागरिकांनी ही लस घेतली आहे, तर १,११,०१४ नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

कोट

कोविशिल्डचा जास्त पुरवठा जास्त असल्याने बहुतांश केंद्रांवर ही लस आहे. त्याच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्यामुळे दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाते. दोन्ही लसी परिणामकारक आहेत.

डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

पाईंटर

वयोगटानुसार लसीकरण

कोविशिल्ड कोव्हॅक्सिन

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस

दुसरा डोस

Web Title: Best of both corona vaccines, more of the supply Covishield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.