लागवडीच्या कांद्याला२० वर्षातील सर्वाधिक भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:09 AM2019-04-21T01:09:23+5:302019-04-21T01:09:45+5:30
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी पांढºया कांद्याला शनिवारी २० वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १३०० रुपये भाव मिळाल्याचे कांदा व्यापारी सतीश कावरे यांनी सांगितले.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी पांढºया कांद्याला शनिवारी २० वर्षांतील उच्चांकी दर मिळाला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते १३०० रुपये भाव मिळाल्याचे कांदा व्यापारी सतीश कावरे यांनी सांगितले. रोपांच्या लागवडीपासून तयार केल्या जाणाºया कांद्यासाठी हा दर देण्यात आला.
ट्रॅक्टरने किंवा हाताने बी फेकून उत्पादित केलेला कांदा हा हलक्या प्रतीचा असतो. या कांद्याला अद्याप २०० ते ३०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. लाला कांद्याला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर येथून अमरावतीच्या कृषिउत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात कांदा आणला जात असल्याची माहिती कावरे यांनी दिली. शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा याच ठिकाणी लिलाव करण्यात येतो. काही वर्षांत एप्रिल महिन्यात येणाºया लागवडीच्या स्थानिक काद्यांला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायचे. यंदा मात्र पहिल्यांदाच प्रतिकिलो दहा रुपयांवर मिळाला आहे.
रोपे उगवून पुन्हा लागवडीचा कांदा चांगल्या प्रतीचा मानला जातो. त्याचे उत्पादनसुद्धा चांगले होते. तो कांदा भरीव असतो. मात्र, ट्रॅक्टरने बी फेकून उगवलेला कांदा चांगल्या प्रतीचा येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे उत्पादनही कमी होते. त्याकारणाने शेतकºयांनी काद्यांची रोपे तयार करून त्यांची पेरपेरणी हातानी करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
शहरात काद्यांचे दहा ठोक व्यापारी आहेत. त्यापैकी प्रत्येकी एका व्यापाºयाकडे रोज किमान ५०० ते १००० हजार क्विंटलपर्यंत काद्यांची खरेदी होते. कांद्याची आवक बºयापैकी असल्याचे सतीश कावरे यांनी सांगितले.
गेल्या २० वर्षातील सर्वाधिक भाव यंदा उन्हाळी काद्यांला मिळाला आहे. सद्यस्थितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला १००० ते १३०० प्रतिक्विंटल भाव मिळाला असून, त्याकारणाने स्थानिक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- सतीश कावरे, ठोक कांदा विक्रेता, अमरावती.
हलक्या कांद्याची पावडर
हलक्या प्रतीच्या व बियाणे फेकून उत्पादित झालेल्या कांद्याला भाव कमी मिळतो. लंबगोल असलेल्या या कांद्याला पोंगा असे म्हटले जाते. एक ते तीन रुपये किलोप्रमाणे त्या काद्यांची खरेदी केली जाते. त्या काद्यांला अंत्यंत कमी दरात खरेदी करून अमरावतीतून गुजरात राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या कंपन्यांमध्ये पावडर करण्यासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.
कांदा आणणार डोळ्यांत पाणी
यंदा कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याकारणाने उन्हाळी काद्यांला चांगला भाव मिळाला आहे. या कांद्याच्या किमती पुढे वाढत जाऊन २० रुपये किलो स्तरावरदेखील जाऊ शकतात. त्याकारणाने कांद्याची साठवणूक करण्याकडे ठोक व किरकोळ व्यापाºयांचा कल आहे. किरकोळ व्यापारी हाच कांदा उत्पादन थांबल्यानंतर ४० रुपये किलो दराने विक्रीला काढतील. त्याकारणाने काद्यांमुळे वांदा होणार असून, कांदा लोकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याची शक्यता असल्याचे कांदा व्यापाºयांचे मत आहे.
खंडीचे व्यवहार
दोन क्विंटल म्हणजे एक खंडी. या खंडीचा व्यवहार थेट शेतकरी व व्यापाºयांमध्ये होतो, मात्र केवळ शेतातच. शेतात कांद्याचे पीक तयार होताच हे व्यवहार करण्यात येतात. यामध्ये व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत जातो. मात्र, बाजार समितीत खंडीचे व्यवहार होत नाहीत.