सावधान! झाडांवर खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:32 PM2023-08-23T16:32:50+5:302023-08-23T16:36:12+5:30
झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश
मनीष तसरे
अमरावती : शहरात अनधिकृतपणे बॅनरबाजी करूण शहरातील झाडांवर जाहिराती लटकविण्यासाठी खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा होत आहे. झाडांवर खिळे ठोकून जाहीरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो मात्र आज पर्यंत अमरावती महापालिकेकडून एकाही जाहीरात कंपनीवर गुन्हा दाखल केला नाही.२००८-२००९ च्या वृक्षगणना नुसार शहरात ५ लाख ४८ हजार झाडे हाेते. दरदिवशी विवीध कारनाने ५० झाडे तोडली जातात.
झाडांना इजा पोहोवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आधीच महापालिकेने दिला आहे. वृक्षसंवर्धन व नव्या रोपांची लागवड करून राज्याच्या हरित पट्ट्यात वाढ करण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक झटत असताना काही विकृत लोक मात्र झाडांवर फलक लावणे, बुंध्यावर नावे कोरणे यांसारखी कृत्ये करत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी झाडे लावून महाराष्ट्र हरित करण्याचा प्रयत्न करत आहे. अमरावती महानगर पालिकेकडूनही मागील वर्षी ५ हजार झाडे लावली तर या वर्षी जुलौ अखेरीस २८ हजार झाडे लावण्यात आली.
अमरावती महापलिका हद्दीत झांडावर जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. झाडावरील जाहीरातींचे फलक काढण्याचे आदेश बाजार परवाना विभागाला दिला आहे.
- देवीदास पवार,मनपा आयुक्त, अमरावती महापालिका