बोगस बीटी बियाण्यांपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:25 PM2018-05-04T23:25:06+5:302018-05-04T23:25:06+5:30
खरीप हंगामात कापूस बियाण्यांची खरेदी करीत असताना शेतकऱ्यांनी सतर्क तसेच बोगस बीटी बियाण्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या किसान कल्याण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केले.
दर्यापूर : खरीप हंगामात कापूस बियाण्यांची खरेदी करीत असताना शेतकऱ्यांनी सतर्क तसेच बोगस बीटी बियाण्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या किसान कल्याण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केले.
बियाण्यांची खरेदी ही अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातूनच करावी. बियाणे खरेदी करतांना शेतकºयांनी पक्के बिल घ्यावे, अशा सूचना या कार्यशाळेत शेतकऱ्यांच्या हितार्थ देण्यात आल्या. दर्यापूर बाजार समितीत बुधवारी कृषी विभागाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला तहसीलदार अमोल कुंभार, विजय लाजूरकर, कृषितज्ज्ञ अरविंद नळकांडे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र तराळ, राजेंद्र रेखे, शास्त्रज्ञ पी.व्ही. पाटील, मार्गदर्शक जितेंद्र दुर्गे, प्रशांत काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी उद्धव मायेकर आदींची उपस्थिती होती.