गोवंश मांसाची वाहतूक कराल तर खबरदार

By admin | Published: February 27, 2016 12:08 AM2016-02-27T00:08:39+5:302016-02-27T00:08:39+5:30

गोवंश हत्या करून मांसाची अवैधरीत्या वाहतूक कराल तर खबरदार,....

Beware if cattle transport | गोवंश मांसाची वाहतूक कराल तर खबरदार

गोवंश मांसाची वाहतूक कराल तर खबरदार

Next

सीपींची समज : पोलीस आयुक्तालयात बैठक
अमरावती : गोवंश हत्या करून मांसाची अवैधरीत्या वाहतूक कराल तर खबरदार, असा समज शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कुरेशी समाजातील व्यावसायिकांना दिला.
मागील काही महिन्यांत शहरातून अवैधरीत्या गोवंश मांसाची वाहतूक होत असल्याची तक्रार बंजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मंडलिक यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करून कुरेशी समाजातील व्यावसायिकांना बोलाविले होते. त्यानुसार बैठकीला बहुतांश कुरेशी समाज व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शविली. शहरातून मोठ्या प्रमाणात मांसांची अवैधरीत्या वाहतूक केली जात आहे. तसेच अवैधरित्या कत्तलखाने सुरु आहेत. त्यामुळे गोवंश मांसाची वाहतूक करू नका, अवैधरीत्या चालणारी कत्तलखाने बंद करा, मांस विक्रीसंदर्भात नियमांचे पालन करा. अशा सूचना पोलीस आयुक्तांनी कुरेशी व्यावसायिकांना दिल्या. अवैधरीत्या कत्तलखाने व मासांची वाहतूक होताना आढळल्यास कारवाई करू, असा इशारा पोलीस आयुक्तांनी कुरेशी समाजातील व्यावसायिकांना दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Beware if cattle transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.