खबरदार ! बालविवाह लावाल तर खडी फोडायला जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:39 PM2024-05-10T14:39:01+5:302024-05-10T14:39:50+5:30

जिल्हाधिकारी सौरभ कटियार : अक्षय्य तृतीया मुहूर्तावर करडी नजर

Beware! If you do child marriage, you will be in jail | खबरदार ! बालविवाह लावाल तर खडी फोडायला जाल

If you do child marriage, you will be in jail

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. १० मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली.


बालविवाह प्रतिबंध अधिनियम नागरिक, २००६ नुसार अक्षय्य तृतीया या दिवशी फोटोग्राफर होणारे बालविवाह लावण्यास आदींवर प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह कारवाई लावणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध जिल्हाधिकारी अधिनियमानुसार कारवाई केली जाते. 


मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती, विवाहाला उपस्थित सर्व कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, , लग्नविधी करणारे, कायद्यानुसार दंडात्मक करण्याचे आदेश कटियार यांनी संबंधितांना दिले.

अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातील. गत सहा वर्षांत तब्बल ३ हजार ९५४ बालविवाह प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोखले आहेत. मागील वर्षभरात २४ बालविवाह महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आले आहेत. 

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार नियुक्त बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांना बालविवाह घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दक्ष राहून बालविवाह रोखण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्यक्रम, रॅली, माहितीपत्रके अशा विविध माध्यमातून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करावी. आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ किंवा ९०२१३५८८१६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
 

Web Title: Beware! If you do child marriage, you will be in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.