लॉटरी लागल्याचे ई मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:21+5:302021-08-18T04:17:21+5:30
असाईनमेंट प्रदीप भाकरे अमरावती : सायबर गुन्हेगारांनी आता ऑनलाईन फसवणुकीसाठी लॉटरी लागल्याचा नवा फंडा शोधला आहे. या फंड्यात फसविण्यासाठी ...
असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : सायबर गुन्हेगारांनी आता ऑनलाईन फसवणुकीसाठी लॉटरी लागल्याचा नवा फंडा शोधला आहे. या फंड्यात फसविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्राहकांना फोन करून २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगतो आहे. त्या प्रलोभनाला बळी पडू नका, अन्यथा पस्तावण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकेल.
विविध फंडे वापरून अनेकांच्या बँक डिटेल्स घेऊन त्यांच्या बँक खात्यातील रक्कम क्षणार्धात वळवून अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण देशात घडत आहेत. अनेकदा तर, बँकेतून बोलत असल्याची खोटी बतावणी करून बँक डिटेल्ससह एटीएम नंबर आणि ओटीपी दिल्याने खात्यातील पैसे ऑनलाइन काढून अनेकांना गंडा घातल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
बॉक्स
फिशिंग ई-मेल
एखाद्याने तुम्हाला फसवून वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करायला लावण्याचा प्रयत्न केल्यास, फिशिंग हल्ला होतो. फिशिंग साधारणपणे ईमेल, जाहिराती किंवा तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या साईटसारख्या दिसणाऱ्या साईटद्वारे केले जाते. उदाहरणार्थ, फिशिंग करणारी व्यक्ती तुम्हाला तुमच्या बँकेने पाठवलेल्या ईमेलसारखा ईमेल पाठवू शकते. जेणेकरून, तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती त्यांना द्याल. त्यातून फसवणूक केली जाते.
ही घ्या काळजी
१) वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या साईटवरून आलेल्या ईमेलपासून नेहमी सावध राहा. तुम्हाला या प्रकारचा ईमेल मिळाल्यास ईमेल खरा असल्याची खात्री केल्याशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
२) पाठवणाऱ्याकडे जी-मेल ॲड्रेस असल्यास, जी-मेल गैरवापराबद्दल तक्रार करा. जी-मेल तुम्हाला तुमच्या पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती ईमेलवर विचारणार नाही.
३) तुम्हाला एखादा संशयास्पद दिसणारा ईमेल मिळाल्यास, ईमेल ॲड्रेस आणि पाठवणाऱ्याचे नाव जुळत असल्याचे तपासा. ईमेल ऑथेंटिकेट केला आहे का, ते तपासा.
//////////
वेबसाईटची सुरुवात ‘एचटीटीपीएस’पासून झाली का?
१) कोणत्याही वेबासाईटवर क्लिक करण्यापूर्वी त्या नावाची सुरुवात ‘एचटीटीपीएस’पासून झाली का? हे तपासा.
२) खात्री करा. ‘एचटीटीपीएस’पासून सुरुवात झाली असेल, तर त्यावर क्लिक करा.
३) एचटीटीपी आणि एचटीटीपीएस हे काही नियम आहेत, ज्यांचा वापर करणे आंतरजालावर सर्वांना बंधनकारक आहे.
////////////
लॉटरी लागली म्हणून पाच लाख उकळले
केस १: कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर येथील भावा-बहिणीला रिवॉर्डचे आमिष दाखिवण्यात आले. त्यांची २ लाख १ हजार रुपयांनी फसवणूक झाली.
केस २
२५ लाख रुपयांची लाॅटरी लागल्याची बतावणी करण्यात आली. त्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगून ९० हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला.