वरूड तालुक्यात भूदान जमिनीची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:54 PM2019-01-13T22:54:04+5:302019-01-13T22:55:01+5:30
भूदान यज्ञ अधिनियमाची अनुमती नसताना वरूड तालुक्यात मौजा ममदापूर येथे जुना सर्वे नं.१८/१ व गट नं.४७ येथील भूदान क्षेत्र ४.९० पैकी एक हेक्टरची हस्तांतरित क्षेत्राची नियमबाह्य नोंद तलाठी कार्यालयाने घेतली आहे. या जमिनीचा खरेदीचा व्यवहार झाला व त्याचा फेरफार भूदान ऐवजी अन्य व्यक्तींच्या नावे घेण्यात आल्याचा आरोप विदर्भ भूदान-ग्रामदान सहयोग समितीद्वारा करण्यात आला. समितीच्या निवेदनाकडे वरूड तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भूदान यज्ञ अधिनियमाची अनुमती नसताना वरूड तालुक्यात मौजा ममदापूर येथे जुना सर्वे नं.१८/१ व गट नं.४७ येथील भूदान क्षेत्र ४.९० पैकी एक हेक्टरची हस्तांतरित क्षेत्राची नियमबाह्य नोंद तलाठी कार्यालयाने घेतली आहे. या जमिनीचा खरेदीचा व्यवहार झाला व त्याचा फेरफार भूदान ऐवजी अन्य व्यक्तींच्या नावे घेण्यात आल्याचा आरोप विदर्भ भूदान-ग्रामदान सहयोग समितीद्वारा करण्यात आला. समितीच्या निवेदनाकडे वरूड तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे.
वरूड तालुक्यातील मौजा ममदापूर गट क्रं. ४७ अंतर्गत एकूण ४.९० हेक्टर आर भूदान जमिनीपैकी एक हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने पट्टा क्र. २२१ हा २४ नोव्हेंबर १९९६ रोजी बाबाराव शामराव घोरमाडे यांना वाहितीसाठी दिला भूदान यक्ष अधिनियम १९५३ कलम २३ अन्वये वाटप झालेल्या जमिनीची नोंद अधिनियमाच्या कलम २४ नुसार ममदापूर तलाठ्याने फेरफार क्र. ३६१ नुसार अधिकार अभिलेख्यात घेतली. भूदानधारक बाबाराव घोडमारे यांनी प्राप्त भूदान जमीन संध्या प्रभाकर इंगोले यांना अडीच लाखांत २४ मे २०१२ रोजी खरेदी करून दिली. खरेदीदार इंगोले याचे नाव अधिकार अभिलेखात भूदानधारक पट्याऐवजी त्यांच्या नावाने फेरफार क्र. ५०३ अन्वये ३० जून २०१४ ला घेण्यात आलेला आहे.
भूूदान जमीनीच्या खरेदीदार संध्या इंगोले यांनी १६ जोनेवारी २०१८ रोजी ही भूदान जमीन सात लाखांत सतीश उत्तमराव महल्ले व अरुण रंगराव महल्ले यांना खरेदी करून दिली. भूदान जमिनीचे दुसरे खरेदीदाराचे नावे अधिकार अभिलेखात भूदानधारक पट्याऐवजी त्यांच्या नावाने फेरफार क्र. ५५५ हा ७ जून २०१८ अन्वये नोंदविण्यात आला. भूूदान जमिनीच्या विक्रीची अनुमती अधिनियमाद्वारे नसतानासुद्धा विक्री करण्यात आली व तलाठ्यांनी या विषयीचे नियमबाह्य फेरफार घेतल्याने हे फेरफार रद्द करून भूदानच्या नावानेच करणे महत्त्वाचे आहे. मात्र, वरूड तहसीलदारांसह जिल्हाधिकाºयांच्या दुलर्क्षामुळे लाखो रूपयांच्या भूूदान जमिनीची नियमबाह्य वाट लागली आहे. तलाठी कार्यालयात फेरफार व भूूदान यज्ञ अधिनियमाला डावलून होत आहे. जिल्हा प्रशासनदेखील दुर्लक्ष करीत असल्याने भूदान कार्यकर्त्यातर्फे जनहित याचिकेद्वारे दाद मागण्याचा प्रकार अंगीकारला जात आहे.
अधिनियमाचे उल्लंघन अन् शासनाची फसवणूक
स्वत: वाहिपेरी करण्यास समर्थ असलेल्या भूमिहीन शेतमजुरास भूदान यज्ञ मंडळाद्वारा कलम २३ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या भूदानधारक पट्ट््याच्या अधारेच अधिकार अभिलेखात नोंद घेतली जावी, अशी कलम २४ अन्वये स्पष्ट आज्ञा केलेली आहे. मात्र, तलाठी मौजा ममदापूर व मंडळ अधिकारी लोणी यांनी भूमिहीन शेतमजूर नसलेल्या व भूदानधारक पट्टा अप्राप्त व्यक्तींच्या नावे अधिकार अभिलेखात नोंद घेतली आहे. या प्रकारात त्यांचेद्वारा भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे उल्लंघन व शासनाचीदेखील फसवणूक केल्यामुळे जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी करतील का चौकशी?
भूदान यज्ञ अधिनियम २५ अन्वये जिल्हाधिकाऱ्यास अधिकार प्राप्त आहेत. त्यानुसार, मौजा ममदापूर प्रकरणात संबंधित तलाठी ममदापूर व मंडळ अधिकारी लोणी यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
खरेदी खताचे आधारे घेतलेले फेरफार ५०३ व ५५५ हे त्वरित रद्द करावे व खरेदी केलेली जमीन भूदान यज्ञ मंडळाचे नावे वर्ग करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांच्याकडे तातडीने पाठविण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.