प्राण्यांना पाणी उपलब्ध करणारा भगीरथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:25+5:302021-03-22T04:12:25+5:30
वन्य प्राण्यासाठी उन्हाळ्याची सोय, कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती पोहरा बंदी : परिसरातील जंगलात हरीण, चित्तळ, काळविट, रोही, रानकुत्रे, राष्ट्रीय पक्षी ...
वन्य प्राण्यासाठी उन्हाळ्याची सोय, कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती
पोहरा बंदी : परिसरातील जंगलात हरीण, चित्तळ, काळविट, रोही, रानकुत्रे, राष्ट्रीय पक्षी मोर, लांडगा, रानडुक्कर, ससे, विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी आहेत. या राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असतो. त्यांच्यासाठी लोणटेक बीट वनरक्षक नावेद काझी यांनी कृत्रिम तळे निर्माण केले आहे.
भातकुली वर्तुळातील लोणटेक बीटमध्ये वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडे भटकंती सुरू असते. भटकंतीदरम्यान वन्यप्राण्याचे अपघात होऊन त्यात दगावल्याच्या घटनाही घडतात. या घटना रोखण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी लोणटेक बीटमध्ये तडकाफडकी एक कृत्रिम पाणवठा तयार करण्याच्या सूचना काझी यांना दिल्या. बीट वनरक्षक नावेद काझी यांनी गणवेशात पावडे, टोपले घेऊन वनमजूर निरंजन राठोड यांच्यासोबत राबले.