भैयू महाराजांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:05 PM2018-06-27T22:05:18+5:302018-06-27T22:05:33+5:30
सूर्योदय परिवार, अमरावतीच्यावतीने पूज्य भैयूजी महारांजाचा अस्थिकलश बुधवारी येथील मातोश्री विमलादेवी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सूर्योदय परिवारच्या गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर पे्रम करणाऱ्या भाविकांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्योदय परिवार, अमरावतीच्यावतीने पूज्य भैयूजी महारांजाचा अस्थिकलश बुधवारी येथील मातोश्री विमलादेवी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सूर्योदय परिवारच्या गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर पे्रम करणाऱ्या भाविकांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.
वंदनीय महाराजांचे कार्य अखंड सुरू राहावे व त्यांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. महाराजांच्या शिकवणीनुसार शांतता व शिस्तीत अस्थिकलशाला पुष्प वाहून उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पित केली. भैयूजी महाराजाची राष्ट्रभक्ती, राष्ट्रपे्रम अद्वितीय होते. महाराजांचीे अध्यात्मिक झेप व देशसेवा अजोड होती. वंचित समाजाला प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे कार्य आहे, अशाप्रकारे महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराजांचे प्रखर राष्ट्रकार्य अखंड व अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला. यावेळी नरेशचंद्र ठाकरे, प्रदीप वडनेरे, हेमंत काळमेघ, गजानन पुंडकर, हेमंत देशमुख, राजेंद्र तायडे, राजेंद्र महल्ले, नितीन हिवसे, स्वप्निल देशमुख, राजू सुंदरकर, पंकज देशमुख, प्रशांत डवरे, मनोज देशमुख, केशवराव मेटकर, अंबरीश देवगावकर, राजेश शेरेकर, रविराज देशमुख, किशोर शिरभाते, सुभाष चव्हान, बबलू वºहेकर, अमोल देशमुख, गजानन लोखंडे, राहूल देशमुख, अंकुश इंगोले यासह शेकडो गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर प्रेम करणाºया भाविकांनी श्रद्धांजली केली. गुरुवारी अस्थिकलश पुलगाव येथे दर्शनाला ठेवण्यात येणार आहे.