भंडारी, दुबेंची तक्रार करणाऱ्या फुलाडींचीही चौकशी

By admin | Published: May 19, 2017 12:33 AM2017-05-19T00:33:17+5:302017-05-19T00:33:17+5:30

क्लब हाऊसला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात स्वहस्ताक्षरात लिहिणाऱ्या घनश्याम भंडारी आणि अमित दुबे यांच्याविरुद्ध

Bhandari, the flowers of the complaint of the luncheon, also inquired | भंडारी, दुबेंची तक्रार करणाऱ्या फुलाडींचीही चौकशी

भंडारी, दुबेंची तक्रार करणाऱ्या फुलाडींचीही चौकशी

Next

‘एडीटीपी’तील हालचाली संशयास्पद : ‘एनओसी’वर पार्लरची नोंद केल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : क्लब हाऊसला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात स्वहस्ताक्षरात लिहिणाऱ्या घनश्याम भंडारी आणि अमित दुबे यांच्याविरुद्ध ज्या कनिष्ठ कारकुनाने बुधवारी पोलिसात तक्रार नोंदविली त्या दिलीप फुलाडींचीच चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले.
हुक्का पार्लरच्या ना-हरकत प्रमाणपत्राचा मुद्दा गाजत असताना घनशाम भंडारी याला ‘मनोरंजन’ याघटकांतर्गत ‘क्लब हाऊस’ला ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले. सहायक संचालक नगररचना विभागाने दिलेले हे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र संशयात अडकले आहे.

आयुक्त अनभिज्ञ
अमरावती : दस्तुरखुद्द आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला असून कुठल्या नियमाच्या आधारे आपण ‘क्लब हाऊस’ला एनओसी दिली, अशी विचारणा आयुक्तांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे यांना केली आहे.
या प्रकरणातील आरोपी अमित दुबे हा एडीटीपी कार्यालयातून बाहेर पडताना फुलाडी यांची दुबेसोबत झालेली आपुलकीची भेट संशयाला वाव देणारी आहे. लिपिक फुलाडी यांचेकडून मनोरंजनासाठी एनओसी घेतल्यानंतर भंडारी यांनी त्या शासकीय कागदपत्रावर हुक्का पार्लर, पूल, कार्डरूम व व्हिडिओ गेम पार्लर अशी स्वहस्ताक्षरात नोंद केली होती.
मनोरंजनासाठी ‘क्लब हाऊस’ चालविण्यासाठी घनशाम भंडारीने महापालिकेतील नगररचना विभागात ‘ना-हरकत’ मागितली. ती देण्यातही आली. तथापि मागील १५ दिवसांपासून हुक्का पार्लरचा मुद्दा गाजत असताना एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांनी हा प्रकार आयुक्तांच्या कानावर घातला नाही. त्यामुळे ‘ना-हरकत’ देईपर्यंत व पुढील प्रकार घडेपर्यंत आयुक्त याविषयापासून अनभिज्ञ होते.

२० पर्यंत पीसीआरर
आरोपी घनशाम भंडारी आणि अमित दुबे यांना स्थानिक न्यायालयाने २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी हा प्रकार पूर्वनियोजित पद्धतीने केला, अशी बाजू पोलिसांनी मांडली.

आज नोंदविणार बयाण
कोतवालीचे पीएसआय आर. एस. लेवटकर शुक्रवारी सुरेंद्र कांबळे, दिलीप फुलाडी आणि त्यांच्यालगत बसलेल्या कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविणार आहेत. बाहेरची व्यक्ती कार्यालयातील कपाटातून फाईल काढते, ती राजरोसपणे ठेऊनही देते, ही बाब या कार्यालयात उपस्थित असलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या लक्षात येऊ नये, हे संशयास्पद आहे.

भंडारी आणि दुबेंचा बेकायदेशीर प्रकार एडीटीपी कांबळेंनी मला सांगितला. त्यानुसार फौजदारीचे निर्देश दिलेत. इतकेच नव्हे तर देण्यात आलेल्या एनओसीबाबतबही विचारणा करण्यात आली. महापालिका स्तरावर चौकशी आरंभली आहे.
- हेमंत पवार, आयुक्त

 

Web Title: Bhandari, the flowers of the complaint of the luncheon, also inquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.