अचलपूर तहसीलची भरारी पथके ‘ॲक्शन मोड’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:23+5:302021-05-12T04:13:23+5:30
अचलपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अचलपूर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी ...
अचलपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अचलपूर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. सहा मंडळांमध्ये सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्व स्तरांतून प्रयत्न करीत आहे. तहसील, पोलीस, नगर परिषद, पंचायत समिती विभाग संयुक्त परिश्रम घेत आहेत. या कडक लाॅकडाऊनमध्ये मेडिकल स्टोअर, दवाखाने आदी आरोग्य सेवा सुरू असले तरी आवश्यक असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे, अन्यथा घरातच राहावे, असे आवाहन अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी केले. अचलपूर तालुक्यामध्ये सहा महसूल मंडळांमध्ये सहा भरारी पथके तयार करण्यात आली. ही भरारी पथक गावोगावी जाऊन नागरिकांना मास्क लावणे, घरातच राहणे तसेच प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.