इंडिया रेड संघात भारती फुलमालीची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:43 IST2017-12-24T19:42:56+5:302017-12-24T19:43:35+5:30

उत्कृष्ट फलंदाजी करणा-या भारती फुलमाली यांची भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिथाली राज यांच्या इंडिया रेड या संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट चॅलेंजर ट्रॉफी ४ जानेवारी २०१८ पासून सुरू होत असलेल्या सामन्यात ती खेळणार आहे.

Bharti Phulamali's selection in India Red team | इंडिया रेड संघात भारती फुलमालीची निवड

इंडिया रेड संघात भारती फुलमालीची निवड

अमरावती - उत्कृष्ट फलंदाजी करणा-या भारती फुलमाली यांची भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिथाली राज यांच्या इंडिया रेड या संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट चॅलेंजर ट्रॉफी ४ जानेवारी २०१८ पासून सुरू होत असलेल्या सामन्यात ती खेळणार आहे. भारती फुलमाली संत गजानन क्रिकेट अकादमीची खेळाडू असून यापूर्वी भारती ही विदर्भ महिला क्रिकेटची उपकर्णधारसुद्धा राहिली आहे.
भारती ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात पोहोचल्याने अमरावती जिल्ह्याची मान उंचावली आहे. तिच्या यशाचे श्रेय ती आई-वडील व अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप गावंडे यांना देते. विनोद कपिले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, कडू, प्राचार्य उल्हास देशमुख, प्रशांत सोनारे, शशी कडू , प्रतीक घोगरे, अमर मोर, विजय चौहान, समीर खान, आशीष ताथोडे पाटील, सुयोग शहस्त्रबुद्धे भारतीचे कौतुक केले.

Web Title: Bharti Phulamali's selection in India Red team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.