स्वच्छता अभियानाने भाऊसाहेबांच्या जयंत्युसवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:10 AM2017-12-25T01:10:43+5:302017-12-25T01:10:56+5:30
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११९ वा जयंती उत्सव रविवारी स्वच्छता अभियानाने प्रारंभ झाला. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११९ वा जयंती उत्सव रविवारी स्वच्छता अभियानाने प्रारंभ झाला. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हे अभियान राबविण्यात आले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला हव्याप्रचे प्रशांत चौधरी, विजय इंगोले, संजय तिरथकर, नंदू जगताप हे प्रमुख पाहुणे होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, अशोक ठुसे, संस्थेचे सचिव शेषराव खाडे व आजीवन सदस्य प्रभाकरराव फुसे, गावंडे उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता एन.बी. उमाळे, वैद्यकीय अधीक्षक सोमेश्वर निर्मळ व प्राध्यापक व विभागप्रमुख के.वाय. विल्हेकर, ए.टी. देशमुख, जी.एन. पुंडकर, एस.बी. देशमुख, ए.के. जावरकर, आर.आर. सोनी, एच.एस. पांडे, एम.डब्ल्यू. जगताप, ए.जी. काळबांडे, निवाणे, व्ही. आर. वासनिक, व्ही.डी. खानंदे, आर.पी. चोरडिया, शिक्षक आदी कर्मचाºयांनी व हव्याप्रच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व रुग्णालय परिसराची स्वच्छता केली. संस्था पदाधिकारीही या अभियानात सहभागी झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख जयंत्युत्सवाच्या पहिल्या दिवशी पीडीएमसीच्यावतीने आकोट येथे विशेष रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे विमलाबाई देशमुख सभागृहात व्याख्यान झाले.