पंतप्रधानांच्या हस्ते म्हाडा घरकुलांचे भूमिपूजन
By admin | Published: April 13, 2017 12:13 AM2017-04-13T00:13:42+5:302017-04-13T00:13:42+5:30
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने स्थानिक अकोली परिसरात साकारल्या जाणारे १२१८ घरकुलांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी होणार आहे.
अमरावती: गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने स्थानिक अकोली परिसरात साकारल्या जाणारे १२१८ घरकुलांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी होणार आहे. हे भूमिपूजन नागपुरातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी सुभाष शिंदे यांनी बुधवारी पत्रपरिषेदतून दिली.
अकोली येथे ५०.९९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी ४.०७ हेक्टर जमीन उद्यान व ७.९२ हेक्टर जमीन रेल्वे आरक्षणामुळे बाधीत झाली आहे. विकास आराखड्यातील बाधीत क्षेत्र वगळता म्हाडाकडे एकुण अभिन्यास क्षेत्र ३९.१० उपलब्ध आहे. उपलब्ध क्षेत्रफळामध्ये विविध उत्पन्न गटातंर्गत ३८४ भूखंड व ६०० गाळे योजना राबविली वगळता ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत विविध उत्पन्न गटातंर्गत सर्व्हे. क्रमांक ४७, ५७ व ५८ मौजा अकोली येथे ६७४ अत्यल्प, ४३६ मध्यम तर १०८ उच्च उत्पन्न गट गाळे एकुण १२१८ गाळ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. २५.७५ हे. आर क्षेत्रफळ जमिनीवर १३९.८० कोटी रुपये खर्च करुन घरकुल साकारणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आयोजित भूमिपूजन सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगने होणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. अमरावतीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवने, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, आ. यशोमतीे ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, आ. प्रभूदास भिलावेकर, आ. अनिल बोंडे, आ. श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.