जिवे मारण्याचे धमकावून भूदान जमिनी लाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:39 PM2018-07-28T22:39:55+5:302018-07-28T22:40:30+5:30
पट्टाधारकाने हक्क सोडलेल्या जमिनी बळकविण्यासाठी भूदान यज्ञ मंडळाच्या सचिवांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन सर्वोदयी नेत्यांवर दडपण आणून जमीन लाटण्याचे प्रकार भूदान यज्ञ मंडळात होत आहेत. या विषयी यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार झालेली असताना त्याच व्यक्तींस अध्यक्षांद्वारा अधिनियमाला डावलून भूदान जमीन देण्याचा प्रकार झाले. यामुळे भूदानच्या उद्देशालाच तडा गेलेला आहे.
Next
ठळक मुद्देदलाल सक्रिय : मंडळावर पुनर्नियुक्तीसाठी नेत्यांकडे लॉबिंग
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पट्टाधारकाने हक्क सोडलेल्या जमिनी बळकविण्यासाठी भूदान यज्ञ मंडळाच्या सचिवांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन सर्वोदयी नेत्यांवर दडपण आणून जमीन लाटण्याचे प्रकार भूदान यज्ञ मंडळात होत आहेत. या विषयी यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार झालेली असताना त्याच व्यक्तींस अध्यक्षांद्वारा अधिनियमाला डावलून भूदान जमीन देण्याचा प्रकार झाले. यामुळे भूदानच्या उद्देशालाच तडा गेलेला आहे.
अमरावती तालुक्यातील नांदुरा पिंगळाई येथील पट्टा क्र.२५६ ही ७.३६ हेक्टर जमीन २५ सप्टेंबर २०१७ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिचगाव येथील सेवासामर्थ्य बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आली. वास्तविक, ही शेतजमीन देण्यासाठी मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांचा विरोध असल्याने त्यांना शिवदास श्रुंगारे या व्यक्तीने महिनाभर फोन करून धमकाविले. याविषयी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना १३ मार्च २०१६ रोजी भूदान यज्ञ मंडळाच्या लेटरपॅडवर तक्रार करण्यात आली व याच संस्थेला मंडळाने बहुमताने ठराव घेऊन जमीन देणे व याविषयी अध्यक्षांनीदेखील यात रस दाखविणे ही भूदान यज्ञ मंडळाची अधोगती आता कशा प्रकारे होत आहे, याचेच द्योतक आहे.
कापूसतळणी येथील १.३१ हेक्टर जमीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाला आणि यवतमाळ जिल्ह्यातील आलेगाव येथील श्री संत तुकडोजी महाराज प्रचार प्रशिक्षण संस्थेला ४.३ हेक्टर जमीन देण्यात आली. या दोन्ही जमिनी गुरुकुंज येथील निकटस्थांना अध्यक्ष हरिभाऊ वेरूळकर यांनी अधिनियम डावलून दिल्या असल्याचा आरोप होत आहे. येथीलच एका डॉक्टरच्या पत्नीलादेखील भूमिहीन दाखवून भूदान जमिनीचा पट्टा देण्यात आल्याची बाब भूदान अभ्यासक नरेंद बैस यांनी वेरूळकरांना लिहीलेल्या पत्रात अधोरेखित केलेली आहे. याविषयी हरिभाऊ वेरूळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रल्हाद लांजेवार यांनी या तीनही प्रकरणात अमरावतीचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करून हे तिन्ही पट्टे रद्द करण्याची मागणी केलेली आहे.
शासन नियुक्तीसाठी शिफारसपत्रांची धावपळ
भूदान यज्ञ मंडळ हे भूदान जमिनीचे कार्याकरिता राज्य शासनाद्वारा नियुक्त केलेले मंडळ आहे. सद्यस्थितीत केवळ सचिव कार्यरत आहेत. उर्वरित कार्यकारिणी नियुक्त व्हायची आहे. यासाठी माजी अध्यक्ष हरीभाऊ वेरूळकर व अन्य पदाधिकाºयांची यासाठी लॉबिंग सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती करण्यासाठी भाजप व शिवसेनेचे आमदार, खासदार व मंत्री यांची शिफारसपत्र मिळवायचे प्रयत्न होत आहे. बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी वेरूळकरांची पुर्ननियुक्ती अध्यक्षपदी करावी, यासाठी १५ जुलै २०१८ रोजी पत्र दिले, तर अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्याची माहिती आहे.